मुंबई : सोशल मीडियावर आपल्याल्या अशा काही गोष्टी ऐकायला मिळतात, ज्याचा आपण कधी विचार देखील केला नसावा. लोकांने अनेक विचित्र गोष्टी करण्याचा शौक असतो, त्यासाठी ते काहीही करतात. सध्या अशीच एक विचित्र गोष्ट सोशल मीडियावर चर्चेचा विषय बनली आहे. ज्यामध्ये एका महिलेनं फक्त 21 दिवसात 15 वेगवेगळ्या मुलांना डेट केलं आहे. हे ऐकून सगळ्यांनाच धक्का बसला. ज्यानंतर तिनं जगाला एक अनोखी भेट दिली. या महिलेनं आपला अनुभव शब्दात मांडला आणि त्यासंदर्भात एक पुस्तक लिहिलं.


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

या महिलेचं नाव हेलन आहे आणि ती एक लेखीका देखील आहे. डेली स्टारच्या बातमीनुसार, हेलनने चिक डेटिंगवर एक पुस्तक लिहिले आहे. ज्यामध्ये तिने टिंडरवर खरे प्रेम शोधण्याच्या टिप्स देखील दिल्या आहेत.


हेलनच्या पुस्तकाचं नाव आहे 'सेक्स, स्वाइप आणि अनदर स्टोरी'. ज्यामध्ये तिने ऑनलाइन प्रेम शोधण्यासाठी केलेल्या संघर्षाबद्दल सांगितले आहे.


हेलन कबूल करते की, आधुनिक काळात प्रेम आणि साथीदार शोधत असलेल्या लोकांचा तिला पाठिंबा आहे. एका पॉडकास्ट मुलाखतीदरम्यान तिने डेटिंगबद्दल अनेक गोष्टी सांगितल्या आहेत.



हेलनने सांगितले की न्यूयॉर्कच्या प्रवासादरम्यान तिने केवळ 21 दिवसांत 15 लोकांना डेट केले. याच्या अनुभवाबद्दल सांगताना हेलन म्हणाली की, वेळ अशी गोष्ट आहे, जी परत करता येत नाही. त्यामुळे मी वेळेबाबत खूप वक्तशीर आहे. तुम्ही नवीन शहरात गेल्यावर तुम्हाला ठिकाणे बदलावी लागतील. अशा परिस्थितीत तुम्ही अशा लोकांना भेटता ज्यांना तुम्ही शारीरिकदृष्ट्या ओळखत नाही आणि ही खुप मजेशीर गोष्ट आहे.


हेलनचा दोनदा घटस्फोट झाला असल्याची माहिती आहे. त्यांच्या घटस्फोटाबद्दल अनेकांच्या अनेक प्रतिक्रिया आहेत.