मुंबई : सोशल मीडियावर सध्या एक असा व्हिडीओ व्हायरल होत आहे. जे पाहिल्यानंतर तुमच्या अंगावर शहारे आल्या शिवाय रहाणार नाही. कारण, या व्हिडीओमध्ये, दोन स्त्रिया डोंगराच्या उंचावर बसून झोका झूलत आहेत. परंतु त्यांना हे रिस्क घेणं किंवा थरार अनुभवनं खरोखर खूप महागात पडलं आहे. कारण त्यांच्या सोबत जे झालं ते आयुष्यात ते कधीच विसरू शकणार नाहीत.


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

हा व्हिडीओ सोशल मीडियाच्या वेगवेगळ्या प्लॅटफॉर्मवर शेअर केला जात आहे. हा व्हिडीओ पाहून लोकं दंग राहिले आहे. एवढेच काय तर त्यांच्या नशीबाची स्तुती करत आहेत. कारण त्या इतक्या उंचावरुन पडल्या की, त्यांचं जिवंत रहाणे देखील कठीण होते, तरी देखील यांना फक्त खरचटलं आहे.


हा व्हायरल व्हिडीओ रशियाच्या दागिस्तानातील असल्याचे सांगितले जात आहे. अहवालानुसार दोन महिला सहा हजार फूट उंचीवर सुलाक कॅन्यनवर (sulak canyon) झोका घेत असतात. त्यावेळेस तेथे बरेच लोक उपस्थित होते.


या दोन्ही महिलांना एक व्यक्ती जोर जोरात झोका देत आहे. पण, अचानक या झोक्याची एक साखळी तुटते. ज्यामुळे या दोन्ही महिला डोंगराच्या कड्यावरुन पडल्या. पण यांचं नशीब इकतं चांगलं की, लोकांनी त्यांना वेळीच पकडले. अन्यथा या सरळ खाली पडल्या असत्या आणि मोठी घटना घडू शकली असती.


असे सांगितले जात आहे की, या अपघातात नशीबाने महिल्यांना फारसं काही झालं नाही. फक्त त्यांना थोडं खरचटलं आहे. पण या महिला ही घटना कधीही विसरु शकणार नाहीत. हा भितीदायक व्हिडीओ सध्या सोशल मीडियाच्या वेगवेगळ्या प्लॅटफॉर्मवर शेअर केला गेला आहे.



ज्यांनी ज्यांनी हा व्हिडीओ पाहिला तो एका क्षणासाठी नक्कीच स्तब्ध झाला असणार.


त्यानंतर येथील स्थानिक पोलिसांनी घटनेचा तपास सुरू केली आहे की, हा झोका कसा मोडला? या झोक्याची तपासणी आधी केली गेली नव्हती का? या सगळ्याचा ते तपास घेत आहेत.


हा झोका तसा डोंगराच्या जवळ आला असल्यामुळे फारसं काही झालं नाही, परंतु कल्पना करा जर हा झोका उंचावर लांब असता तर काय झालं असतं?