कॅलिफोर्निया: विमानाने प्रवास करताना सुरक्षेच्या दृष्टीने काही नियम तयार केले जातात. अनेकांना विमानात बसल्यानंतर नेमके कोणते नियम पाळायचे हे माहीत नसतं. अशासाठी क्रू मेंबर्स किंवा फ्लाइट अटेंडेंट करण्यासाठी काही कर्मचारी असतात. त्यांनी सांगितलेले नियम काहीवेळा पाळले जात नाहीत. अशावेळी वाद होतो. असाच एक वाद झाला आणि त्या दरम्यान हाणामारी झाली. यामध्ये प्रवासी महिलेनं कर्मचाऱ्याला ठोसा देत तिचे 3 दात तोडले. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

काही लोक नियम मोडण्यात पटाईत असतात. असाच एक व्हिडिओ समोर आला आहे.या व्हिडीओमध्ये महिला प्रवासी एका फ्लाइट अटेंडंटला मारहाण करताना दिसत आहे. हा व्हिडीओ अमेरिकेतील असल्याचं सांगितलं जात आहे.


डेली मेलने दिलेल्या वृत्तानुसार कॅलिफोर्नियामध्ये राहणाऱ्या विवियाना क्वीनोनेजला महिला अटेंडेटने सीट बेल्ट लावल्यानंतर सीट ट्रे बंद करण्यास सांगितला. त्यावरून महिला प्रवाशी तिच्याशी वाद घालू लागली. या छोट्याशा गोष्टीवरून त्यांच्यात प्रकरण हाणामारीपर्यंत गेलं. प्रवासी महिलेनं तिला ठोसा देत फ्लाइट अटेंडेंटचे तीन दात तोडले. 



विमानातील उपस्थितांनी मध्ये न पडता यावेळी बघ्याची भूमिका घेत व्हिडीओ शूट केला. हा घटनेचा व्हिडीओ सोशल मीडियावर वेगानं व्हायरल झाला आहे. साउथवेस्ट एयरलाइन्सच्या विमानात हा धक्कादायक प्रकार घडल्याचं सांगितलं जात आहे. फ्लाइट सॅक्रेमँटो इंटरनेशनल एयरपोर्टवरून सॅन डियागो इंटरनेशनल एयरपोर्टवर जात असताना हा धक्कादायक प्रकार घडला.


फ्लाइटमध्ये महिलेने मास्कही नीट घातला नाही. त्याने फ्लाइट अटेंडंटला मुक्का मारला, ज्यामुळे त्याच्या चेहऱ्याला गंभीर दुखापत झाली. फ्लाईट अटेंडंटला डोळ्याखाली 4 टाके घालण्यात आले असून 3 दात तुटले आहेत. नंतर आणखी एक प्रवासी दोघांच्या मध्ये आला आणि फ्लाइट अटेंडंटची सुटका केली.