मुंबई: लग्न समारंभ सुरू असताना अचानक समोर एक्स येऊन उभा राहातो. असे अनेक प्रकार आपण सिनेमात पाहिले असतील. पण असं प्रत्यक्षात देखील घडलं आहे. अनेकदा लग्नादरम्यान आपल्या पती-पत्नीपासून जुने प्रेमसंबंध लपवल्याचे प्रकार घडतात मात्र भर लग्नात असं काही घडलं की VIDEO पाहून व्हाल  हैराण. एक्स बॉयफ्रेंड तरुणीच्या थेट लग्नात पोहोचला. तिथे पोहोचल्यावर एक मजेशीर प्रकार घडला. त्याचा व्हिडीओ सोशल मीडियावर तुफान व्हायरल होत आहे. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

या व्हिडीओमध्ये आपण पाहू शकता की एका लग्न समारंभात तरुण पोहोचला आहे. हा या तरुणीचा म्हणजेच नववधूचा एक्स बॉयफ्रेंड असल्याची माहिती मिळाली आहे. त्याने स्टेजवर पोहोचत आपल्या एक्स गर्लफ्रेंडला लग्नाच्या शुभेच्छा दिल्या. त्याला पाहून तरुणी खूप खूश झाली. त्याने हात पुढे करून शुभेच्छा दिल्या.


 



त्यानंतर जे घडलं ते कॅमेऱ्यात कैद झालं आणि सोशल मीडियावर तुफान व्हायरल झालं आहे. यामध्ये गोम अशी आहे की या तरुणीनं तिच्या नवऱ्याची परवानगी घेतली. एकदा शेवटचं मी त्याला मिठी मारू का असं विचारलं. दोघंही एकमेकांना नवऱ्याच्या संमतीनं एकदा मिठी मारली. 


बऱ्याचदा पती-पत्नी आपली जुने प्रेम संबंध लपवत असतात किंवा खोटं बोलून ते लग्नानंतरही सुरू असतात. मात्र इथे लग्न समारंभात तरुणीनं होणाऱ्या पतीची परवानगी घेऊन एक्स बॉयफ्रेंडला मिठी मारली. ही संपूर्ण घटना कॅमेऱ्यात कैद झाल्या असून सोशल मीडियावर व्हिडीओ तुफान व्हायरल होत आहे.