मुंबई : बहुतेकदा लोकांमध्ये अशी चर्चा सुरू असते की, पुरुषांपेक्षा स्त्रिया जास्त आयुष्य जगतात की, पुरुष स्त्रियांपेक्षा जास्त आयुष्य जगतात? परंतु या प्रश्नांचे नक्की उत्तर कोणालाच माहित नसते. काही वस्तुस्थितीच्या अभावामुळे लोकं कोणत्याही निकालापर्यंत पोहोचू शकत नाही. मात्र, आता अमेरिकेच्या एका शास्त्रज्ञाने याचे उत्तर सापडले असल्याचा दावा केला आहे.


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

युनिव्हर्सिटी ऑफ साउदर्न डेन्मार्कच्या (University of Southern Denmark) असोसिएट प्रोफेसर डेमोग्राफी वर्जिनिया जरूली (Virginia Zarulli) म्हणतात की, जगभरातील स्त्रियांचे सरासरी वय पुरुषांपेक्षा जास्त असते. यामागची दोन मोठी कारणे समोर आली आहे. ही दोन्ही कारणे बायोलॉजिकल आहेत.


पहिले कारण- सेक्स हार्मोन्समध्ये फरक


सामान्यत: महिलांच्या शरीरात पुरुषांपेक्षा जास्त एस्ट्रोजेन  (Estrogen) आणि कमी टेस्टोस्टेरॉन (Testosterone) हार्मोन्सला तयार केले जातात. इस्ट्रोजेनमुळे महिलांना अनेक आजारांपासून संरक्षण मिळते. यामध्ये हृदयाशी संबंधित आजार देखील आहेत.


परंतु जेव्हा टेस्टोस्टेरॉनचे प्रमाण जास्त होते तेव्हा महिलांना काही रोग होण्याचा धोका वाढतो. उदाहरणार्थ, एंडोमेट्रियल (Endometrial)आणि स्तनाचा कर्करोग होतो. टेस्टोस्टेरॉनमुळे, काही लोकं त्यांच्या तारुण्यातच मरतात.


व्हर्जिनिया म्हणाल्या की, येथे काही अनुवांशिक घटक देखील आहेत, जे महत्त्वपूर्ण योगदान देतात. माणसाच्या शरीरात दोन सेक्स क्रोमोसोम असतात Xआणि Y.


महिलांमध्ये XX क्रोमोसोम असतात. तर पुरुषांमध्ये YY क्रोमोसोम असतात. महिलांच्या X क्रोमोसोममध्ये अतिरिक्त जेनेटिक मटेरीअल असते, जे त्यांना खराब म्यूटेशनपासून वाचवतात.


जरी एक X क्रोमोसोम खराब म्यूटेशनला बळी पडला, तरी स्त्रीयांच्या शरीरातील दुसरा X क्रोमोसोम म्यूटेशन सुरक्षित ठेवून महिलांना दिर्घ आयुष्य देतो.


पॉप्युलेशन अँड डेव्हलपमेंट रिव्यू या जर्नलमध्ये प्रसिद्ध झालेल्या वृत्तानुसार महिलांना निसर्गाकडून एक प्रकारची जैविक भेट मिळाली आहे. जे त्यांना पुरुषांपेक्षा अधिक जगण्याची परवानगी देते.


दुसरे कारण- आरोग्य


व्हर्जिनिया यांनी 1890  ते 1995 दरम्यान 11 हजार बव्हेरियन कॅथोलिक नन्स आणि भिक्षू यांच्या वयाचे विश्लेषण करताना सांगितले की, स्त्रिया जास्त काळ जगतात. येथे अतिशय कठोर धार्मिक नियम असतात. इथे पुरुष आणि स्त्रियांना समान जीवन जगावे लागते. दोघेही धोकादायक व्यवहारापासून लांब रहातात. म्हणूनच  बायोलॉजिकल कारणांमुळे स्त्रिया येथे 2 वर्षे अधिक जगतात.


सन 2018 मध्ये  प्रोसीडिंग्स ऑफ नॅशनल अ‍ॅकॅडमी ऑफ सायन्सेस जर्नलमध्ये एक स्टडी प्रकाशित करण्यात आली. ज्यामध्ये असे म्हटले होते की, आपत्ती, दुष्काळ आणि साथीच्या काळात जन्मलेल्या मुली मुलांपेक्षा जास्त आयुष्य जगतात.


महिला पौष्टिक आहाराकडे अधिक लक्ष देतात, तर पुरुष या बाबतीत कमकुवत आहेत. पुरुष बर्‍याच वेळा फास्ट फूड आणि चरबीयुक्त जेवण खातात. याबद्दलचा अभ्यास गेल्या वर्षी क्लिनिकल अ‍ॅण्ड एक्सपीरिमेंटल मेडिसिनमध्ये प्रकाशित झाला होता. यात असे लिहिले होते की, सरासरी 33 टक्के महिला डॉक्टरांकडे जातात, परंतु पुरुष हे टाळतात.


दुसरीकडे, पुरुष स्त्रियांपेक्षा जास्त मद्यपान करतात आणि धूम्रपान करतात. ज्यामुळे देखील पुरुषांचे जीवन कमी होते.