जेवण करताना महिलेकडून घडली अशी चूक की, स्वयंपाक घरात लागली आग, पाहा व्हिडीओ
सध्या एका महिलेचा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे, जो वाऱ्यासारखा व्हायरल होत आहे.
मुंबई : सोशल मीडियामुळे आजकाल बऱ्याच गोष्टी जाणून घेणे आणि माहिती मिळवणे सोपे झाले आहे. या प्लॅटफॉर्मवर आपल्याला जेवन किंवा वेगवेगळे पदार्थ बनवणे शिकता येतं. ज्यामुळे बऱ्याच गृहीणी इथूनच जेवण बनवण्यासाठी शिकतात. परंतु तुम्हाला माहितीय का, की जेवण बनवणं हे वाटतं तितकं सोप नाही. ज्यांना सगळ्या गोष्टी माहित आहेत, त्यांच्यासाठी हे अगदीच सोपं आहे. परंतु ज्या लोकांची स्वयंपाकाची सुरुवात अगदी शेगडी किंवा गॅस पेटवण्यापासून होते, त्यांच्यासाठी मात्र हा खूप मोठा टास्क आहे.
सध्या असाच एका महिलेचा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे, जो वाऱ्यासारखा व्हायरल होत आहे. या व्हायरल व्हिडीओमध्ये एक महिला जेवण बनवत आहे. परंतु या दरम्यान अशी काही गोष्ट घडते, जी सर्वांनाच आश्चर्यचकित करते.
खरंतर एक महिला स्वयंपाक घरात काम करताना दिसत आहे. या महिलेनं फ्राईंग पॅनमध्ये काहीतरी करायला ठेवलं आहे. जे ती नंतर उचलून बाजूला ठेवते आणि पुन्हा आपलं काम करण्यात व्यस्त होते. परंतु मागे ठेवलेला फ्राईंग पॅन इतका गरम होतो की, त्याला आग लागते. ही महिला तो पॅन पुढे सिंक जवळ आणते, परंतु त्याचा काहीही फायदा होत नाही. कारण ही आग आणखी भडकते.
या नंतर ही महिला तो पॅन पुन्हा पाठीमागील गॅसवर ठेवते आणि तेथून निघून जाते. काही सेकंदांनी ती पुन्हा येते आणि आग विझवण्याचा प्रयत्न करते. ही संपूर्ण घटना खरोखरच खूप धक्कादायक आहे. नशीबाने जास्त मोठी आणि भयानक घटना या महिलेसोबत घडली नाही.
तसे पाहाता व्हिडीओमधील ही महिला अनुभवी आहे की नाही हे कळू शकले नाही. परंतु तिच्या वागण्यावरुन तरी ती पहिल्यांदा स्वयंपाक घरात काम करण्यासाठी आली असावी असं दिसतंय.....
पाहा व्हिडीओ
कॅली कॅरॉन असे या महिलेचे नाव आहे. ती अमेरिकेतील फ्लोरिडा येथील रहिवासी आहे. ती तिचे व्हिडीओ सोशल मीडियावर पोस्ट करत असते. पूर्वी ती तिच्या चाहत्यांसोबत लाईव्ह स्ट्रीम करत होती. परंतु या वेळेस ती स्वयंपाकघरात उभी असल्याचे दिसून येते. ती स्वयंपाक घरात जेवण बनवत असताना आजूबाजूला धूर झाला आहे. परंतु असे काही या महिलेसोबत घडेल, याची तिला स्वत:ला ही कल्पना नव्हती.
हा व्हिडीओ वेगवेगळ्या प्लॅटफॉर्मवर शेअर केला जात आहे. या व्हिडीओला ट्विटरवर 77 लाखाहून अधीक व्ह्यूज मिळाले आहेत.