काबूल : अफगणिस्तानमध्ये पुन्हा एकदा तालिबानची सत्ता स्थापन झाली आहे. त्यामुळे तेथील अनेक नागरिक देश सोडण्याचा प्रयत्न करत आहेत. आता तेथील महिला त्यांच्या अधिकारांसाठी चिंतीत आहेत. पूर्वी जेव्हा तालिबानी सत्तेत होते तेव्हा त्यांनी महिलांना फक्त नोकरी आणि शिक्षणापासून वंचित ठेवलं नाही तर घरा बाहेर पडण्यावर देखील सक्ती केली. महिला फक्त पुरूषांसोबत बाहेर फिरू शकतील असा फतवा तालिबानने काढला होता.  अफगाणिस्तानमध्ये पुन्हा तालिबानची सत्ता आल्यामुळे देश सोडण्यासाठी नागरिक देश सोडण्याच्या प्रयत्नात आहेत. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

स्वतःला तालिबानांपासून वाचविण्यासाठी नागरिकांनी काबूल विमानतळावर एकच गर्दी केली. तेव्हा विमानतळावर असलेल्या महिलांनी अमेरिकन सैन्याला जीवन वाचविण्यासाठी मागणी केली. द सनच्या रिपोर्टनुसार, अफगाणिस्तानवर तालिबानचा ताबा असल्याने, मोठ्या संख्येने लोक विमानतळावर पोहोचत आहेत. 



ज्यामुळे देश सोडून सुरक्षित ठिकाणी पोहोचता येईल. पण प्रत्येक व्यक्तीसाठी हे शक्य नाही. अलीकडेच, उडत्या विमानातून पडून दोन नागरिकांचा मृत्यू झाला. सध्या काबूल विमानतळावर अमेरिकन जवानांनी कब्जा केला आहे, पण तालिबानी दहशतवादी त्याच्या बाहेर तैनात आहेत. अफगाणिस्तानमध्ये सर्वात जास्त धोका महिलांना आहे. 


त्यामुळे काबूल विमानतळावर महिलांचा आक्रोश पाहायला मिळत असून, 'आम्हाला वाचवा... तालिबानी येत आहेत...' असं म्हणत अफगाण महिला मदतीसाठी विनंती करत आहेत. सैनिक महिलांची असहाय्यता पाहत आहेत, पण इच्छा असली तरी ते काहीही करू शकत नाहीत. कारण प्रत्येक अफगाणीला सोबत घेणे कोणालाही शक्य नाही. शिवाय विमानतळाबाहेर देखील तालिबानी  आहेत.