नवी दिल्ली: जगात 9 ते 5 नोकरी व्यतिरीक्त अनेक नोकऱ्या आहेत. त्यापैकी काही नोकऱ्या या अजब आहेत हे देखील तितकच खरं आहे.  जगात नोकरीची कमतरता नाही, फक्त काहीही शोधण्याची आणि करण्याची आवड असायला हवी. आत्तापर्यंत आपण बर्‍याच विचित्र नोकर्‍यांबद्दल ऐकलं असेल, ज्यात काम विशेष नाही परंतु पैसा बक्कळ आहे. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

टीमडॉग्स यांनी दिलेल्या रिपोर्टनुसार एका कंपनीने कुत्र्याला सांभाळण्याची नोकरी ऑफर केली आहे. कुत्र्याला सांभाळण्यासाठी चक्क दर महिन्याला 2 लाख रुपये पगार मिळणार आहे. हे वाचून तुम्हाला जरा धक्का बसला असेल. पण हे खरं आहे. Yappy.com नावाच्या वेबसाईटवर एक पपी ऑफिसरची जागा रिक्त आहे. यामध्ये नोकरीसाठी आवश्यक असलेल्या अटीही इतरांपेक्षा वेगळ्या आहेत. 


या नोकरीत एक गोष्ट स्पष्ट केली आहे की येथे फक्त अशाच लोकांची निवड केली जाईल, जे 9 ते 5 पर्यंत कुत्र्यांची काळजी घेऊ शकतात. या व्यक्तीला 8 तास कुत्र्याला कायम आनंदी ठेवाव लागेल. या कुत्र्याला त्याच्या आवडीची खेळणी देऊन तिच्याबरोबर खेळावे लागेल. त्यासोबत या कुत्र्यावर रिसर्चही करावा लागणार आहे. 


निवड झालेल्या व्यक्तीला दर महिन्याला 2 लाख रुपये म्हणजेच वर्षाला 24 लाखांचं पॅकेज मिळणार आहे. ही नोकरी मॅनचेस्टरमध्ये असल्याचं वेबसाईटवर सांगण्यात आलं आहे. एवढ्या पैशांमध्ये एखाद्या व्यक्तीचं आयुष्य सहज सुखकर होईल फक्त इतकच आहे की तुम्हाला कुत्र्यासोबत रोज 8 तास तडजो़ड करावी लागणार आहे. तुमची ती करण्याची तयारी असेल तर या नोकरीची संधी सोडू नका.