World News : एकिकडे संपूर्ण जगातच विध्वंस सुरु असताना आता यात भर टाकणारी आणखी एक घटना घडली आहे. कारण, हवाईमध्ये असणारा जगातील सर्वात मोठा ज्वालामुखी मौना लोआ  (Mauna Loa) पुन्हा सक्रिय झाला असून, त्याचा उद्रेक झाला आहे. या ज्वालामुखीचा (Volcanic Eruption) उद्रेक झाल्यामुळे संपूर्ण आसमंतही लालसर रंगाचं झालं होतं. युनायटेट स्टेट्स जियोलॉजिकल सर्वे (USGS) तर्फे देण्यात आलेल्या माहितीनुसार मौना लोआच्या शिखरावर रविवारीच रात्री साडेअकरा वाजण्याच्या सुमारास स्फोट होण्यास सुरुवात झाली. (World Largest Active Volcano Mauna Loa in hawai Erupted photos viral)


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

सध्याच्या घडीलासुद्धा ज्वालामुखीच्या शिखरावर लाव्हारसाचे (Lava) ओघळ वाहत असल्याचं सांगण्यात येत आहे. दरम्यान, सध्यातरी या उद्रेकामुळं कोणाला इजा पोहोचली नसल्याचं सांगण्यात येत आहे. असं असलं तरीही 4 दशकांनंतर उद्रेक झालेल्या या ज्वालामुळीची दृश्य पाहून पायाखालची जमीन सरकत आहे. 


सर्वत्र पसरणार राख आणि वायूचे लोट 


USGS नं दिलेल्या माहितीनुसार ज्वालामुखीची राख आणि वायूचे लोट दूर अंतरापर्यंत जाऊ शकतात. शिवाय लाव्हारस वाहण्याचा वेगही जास्त असू शकतो. सध्या सुरु असणारे स्फोट सौम्य असल्यास लाव्हारस तिथल्या तिथेच राहू शकतो. पण, हे स्फोट मोठे असल्यामुळं लाव्हारस काही प्रमाणात वाहताना दिसत आहे. 


हेसुद्धा वाचा : मानवाला राहण्यासाठी पृथ्वीपेक्षा एकदम मस्त जागा; शास्त्रज्ञांना सापडले जीवसृष्टी असलेले 24 ग्रह


 


प्राथमिक स्तरावर मिळालेल्या माहितीनुसार अद्यापही मानवी वस्ती असणाऱ्या भागांना या ज्वालामुखीमुळं कोणताच धोका नसल्याचं सांगण्यात येत आहे. दरम्यान, हवाईमध्ये आलेल्या या संकटाचे काही फोटो सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल होत आहेत. स्थानिकांनी सोशल मीडियाचा आधार घेत फोटो पोस्ट करत घटनास्थळाची दृश्य संपूर्ण जगासमोर आली. यामध्ये ढगांवरही लालबुंद छटा आल्याचं पाहायला मिळालं. 



ज्वालामुखी उद्रेकानंतर सदर परिसर आणि त्यापासून काही किलोमीटर अंतरावर याचे थेट परिणाम दिसून येतात. इतकंच नव्हे, तर या उद्रेकातून बाहेर पडणारा वायू आणि धुलीकरण, धुळीचे थरही मानवी जीवनावर मोठ्या प्रमाणावर परिणाम करतात. 


4 दशकांनंतर उद्रेक! 


हवाईमध्ये जगातील पहिल्या आणि दुसऱ्या क्रमांकाचे सर्वात मोठे ज्वालामुखी आहेत. इथं असणाऱ्या आणि सध्या उद्रेक झालेल्या मौना लोआ या ज्वालामुखीची उंची 13600 फूट इतकी आहे. 1984 मध्ये त्याचा उद्रेक झाला होता. जगातील तिसऱ्या क्रमांकाचा ज्वालामुखी स्पेनमध्ये आहे.