Trending News - तुरुंग म्हटलं की आपल्या अंगावर काटा येतो. पोलीस, गुन्हेगार असं शब्द ऐकली की आपलाला भीती वाटते. पोलिसांपासून सगळे चार हात दूर राहतात. गुन्हेगारांना कठोर शिक्षेसाठी तुरुंगवासात पाठवलं जातं. तुरुंग ही अतिशय भयानक जागा असते असं म्हणतात. आज आम्ही तुम्हाला जगातील सगळ्यात भयानक तुरुंगाबद्दल सांगणार आहोत. या तुरुंगात गुन्हेगारी जायला घाबरतात. कुठे आहे हे तुरुंग आणि असं काय घडतं या तुरुंगात ज्यामुळे गुन्हेगारांना घाम फुटतो. 



सर्वाधिक कैदी


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING


डेली स्टार यांनी या तुरुंगाबद्दल एक रिपोर्ट सादर केला आहे. या रिपोर्टनुसार हे तुरुंग सगळ्यात भयानक तुरुंग आहे. काही लोकांचं म्हणं आहे की हे तुरुंग म्हणजे नरक आहे. ब्रिटिशांनी 1960 मध्ये कारागारांच्या आरामासाठी या बिल्डिंगची निर्मिती केली होती. काही काळानंतर 400 कैद्यांना या ठिकाणी ठेवण्यात आलं तेव्हापासून हे तुरुंग झालं. 1990 मध्ये रवांडामध्ये भयानक नरसंहार झाला होता. त्यावेळी या तुरुंगात 50 हजारांपेक्षा जास्त कैदी शिक्षा भोगत होते. सध्या या तुरुंगात 7 हजार कैदी शिक्षा भोगत आहे.


टॉयलेटमध्ये झोपतात कैदी



या तुरुंगात क्षमतेपेक्षा जास्त कैदी असल्याने अनेक कैद्यांना टॉयलेटमध्ये झोपावे लागते. यामुळे अनेक कैदी आजारी पडतात. तर या तुरुंगातील प्रशासन या कैद्यांना योग्य ती मेडिकल सुविधा पण देऊ शकतं नाही. त्यामुळे या तुरुंगात दररोज किमान 6 कैद्यांचा मृत्यू होतो. त्यामुळे प्रत्येक गुन्हेगार या नरकात जायला घाबरतो. 


कैदी खातात मृत कैद्याचं मांस



या तुरुंगात जाण्यास गुन्हेगार थरथर कापतात. या तुरुंगाच्या क्षमतेपेक्षा सर्वाधिक कैदी भरलेले आहेत. वाईट म्हणजे या कैद्यांच्या खाण्याची आणि झोपण्याची बिलकुल व्यवस्था नाही. या तुरुंगात शिक्षा भोगत असलेले कैदी कायम उपाशी असतात. अशात उपासमारीमुळे जर एखाद्या कैद्याचा मृत्यू झाला तर इतर कैदी त्या मृत कैद्याचे मांस खातात. सगळ्यात भयानक म्हणजे अनेक वेळा जर कैदी उपाशी राहिला तर तो इतर कैद्यांना ओरबडून त्यांचे मांस खातात. 


तुरुंगात घाणीचं साम्राज्य



या तुरुंगात जिकडे पाहावे तिकडे अस्वच्छता पसरली आहे. त्यामुळे या तुरुंगात रोगांचं साम्राज्य पाहिला मिळतं. त्यामुळे या तुरुंगातील असंख्य कैदी कायम आजारी असतात. अनेक कैद्यांना वेळीच उपचार न मिळाल्यामुळे त्यांचा मृत्यू होतो. 


कुठे आहे तुरुंग?



आता तुम्हाला प्रश्न पडला असेल हे नरकापेक्षा भयानक असं तुरुंग नक्की आहेत तरी कुठे? तर आफ्रिका खंडातील रवांडामध्ये Gitarama नावाचा हे तुरुंग आहे. उपासमारीमुळेही या तुरुंगात रोज अनेक कैद्यांमध्ये हाणामारी होते. या हाणामारीतही अनेक कैद्यांचा मृत्यू होतो. तुरुंगातील शौचालयातील घाण बाहेर पसरलेली असते. त्यात उभे राहिल्यामुळे अनेक कैद्याचे पाय सडतात. या तुरुंगातील कैद्यांच्या पायांना गँग्रीन होणे ही सामान्य समस्या आहे. त्यामुळे कितीही क्रुर कैदी असो या तुरुंगात जायला तो घाबरतो.