बॉडी बिल्डिंगच्या टीप्स, 10000 फॉलोअर्स... 33 वर्षीय बॉडीबिल्डरच्या मृत्यूने खळबळ
Bodybuilder Dies Of Cardiac Arrest: 33 वर्षांच्या बॉडीबिल्डरचा कार्डिएक अटॅकमुळे मृत्यू झाला. हा बॉडीबिल्डर सोशल मीडियावर प्रचंड लोकप्रिय होता. सोशल मीडियावर तो फिटनेसच्या टीप्स देत असे.
Bodybuilder Dies Of Cardiac Arrest : सोशल मीडियावर बॉडीबिल्डिंगच्या टीप्स देणाऱ्या एका बॉडीबिल्डरचा (Bodybuilder) अवघ्या 33 व्या वर्षी अचानक मृत्यू झाला. कार्डिएक अटॅकमुळे त्याचा मृत्यू झाला. डॉस सैंटोस (Doctor Rodolfo Duarte Ribeiro dos Santos) असं या बॉडीबिल्डरचं नाव होतं, सैंटोस इन्स्टाग्रामवर प्रचंड लोकप्रिय होता. जिममधल्या वर्कआऊटचे व्हिडिओ तो आपल्या इन्स्टाअकाऊंटवर शेअर करत होता. त्याच्याकडून अनेक फिटनेस आणि बॉडीबिल्डींगच्या टीप्स (BodyBuilding Tips) घेत होते. सैंटोस ब्राझिलमधल्या दिग्गज बॉडीबिल्डरपैकी एक मानला जात होता. सैंटोसची प्रकृती अचानक ढासळली. कुटुंबियांनी त्याला तात्काळ साओ पाऊलो इथल्या एका खासगी रुग्णालयात दाखल करण्यात आलं. पण उपचारादरम्यान त्याचा मृत्यू झाला.
डॉस सैंटोस हा व्यवसायाने वकिल होता, पण त्याल बॉडीबिल्डिंगचा छंद होता. डॉस सैंटोसच्या यकृतात ट्यूमर होता. ज्यामुळे रक्तस्त्राव होऊन त्याला कार्डिएक अटॅक आला. यातच त्याचा मृत्यू झाल्याचं रुग्णालयाकडून सांगण्यात आलं. डॉस सैंटोसचा मृत्यू अतिरिक्त स्टेरॉईडमुळे झाल्याची अफवा पसरली होती. पण डॉस सैंटोसवर उपचार करणाऱ्या डॉक्टरने याचा इन्कार केला आहे. डॉस सैंटोस हा फिटनेसबाबत अतिशय जागरुक होता. त्यामुळे तो स्टेराईड्स घेण्याची शक्यता डॉक्टरांनी फेटाळून लावली.
सोशल मीडियावर लोकप्रिय
डॉस सैंटोस नियमितपणे आपल्या फॉलोअर्ससाठी फिटनेसचे व्हिडिओ आपल्या इन्स्टा अकाऊंटवर शेअर करत असे. याशिवाय फॅशन आणि प्रवासासंदर्भातही तो माहित देत असे. इन्स्टा अकाऊंटवर त्याचे तब्बल 10000 हजार फॉलोअर्स होते. नुकतंच त्याचं कैरोलिन सांचेस हिच्याशी लग्न झालं होतं.
डॉस सैंटोस हा दक्षिण मोएमा इथल्या अब्बास डुआर्टे क्लिनिकमध्ये डॉक्टर होता. इथेच काम करणाऱ्या कैरोलिन सांचेशबरोबर त्याचे प्रेमसंबंध जुळले यानंतर दोघांनी लग्न केलं.
हार्टअटॅक का येतो?
प्रमाणापेक्षा जास्त टेन्शन, ताण आणि झोपेची कमतरता असलेल्या लोकांना हृदयविकाराचा झटका येण्याचा धोका अधिक असतो. आरोग्य तज्ञांच्या मते धावपळीमुळे लोकांच्या जीवनशैलीतील मोठे बदल झाले आहेत. कामाचा ताण, कमी झोप यामुळे लोकांचं आरोग्य बिघडलं आहे. ज्यामुळे हृदयविकाराच्या झटक्याला आमंत्रण मिळत आहे. मानसिक ताण हे देखील हृदयविकाराचे कारण असू शकते. या व्यस्त जीवनात कामाचा ताण आणि जबाबदाऱ्यांमुळे लोक खूप चिंतेत असतात. ज्या लोकांना हृदयाशी संबंधित मोठ्या आजारांचा कौटुंबिक इतिहास आहे त्यांनी त्यांच्या आरोग्याबाबत अधिक सतर्क राहावे असं आवाहन तज्ज्ञ करतात.