World News : जगात जवळपास सर्वच देशात भ्रष्टाचार (Corruption) होत असतो. छोट्या मोठ्या योजनांमध्ये प्रकल्पामध्ये, काम करण्यासाठी, काम करुन घेण्यासाठी पैशांची घेवाण देवाण होत फसवणूक केली जाते. फसवणुकीचा (Fraud) असाच एक धक्कादायक प्रकार समोर आला आहे. एका महिलेचा 1993 मध्ये रस्ते अपघातात मृत्यू झाला. पण यानंतरही ती 2007 पर्यंत ऑफिसमध्ये नोकरीसाठी येत होती. निवृत्त झाल्यानंतर 2023 पर्यंत म्हणजे 16 वर्ष तीने पेन्शनही (Pension) घेतलं. गेल्या सोळा वर्षात या महिलेने 46.21 लाख रुपये पेन्शन घेतलं. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

असा झाला पर्दाफाश
आता मृत्यूनंतर ही महिला कामाला कशी आली आणि तीने पेन्शन कसं घेतलं असा प्रश्न तुम्हाला पडला असेल. वास्तिवक यामागे मोठी फसवणूक आहे. चीनमधल्या वूहान शहरातील ही घटना आहे. उत्तरी चीनमधल्या मंगोलिाय भागात वुहाई नावाची एक महिला राहात होती. 1993 मध्य्ये वुहाईचा कार अपघातात मृत्यू झाला. वुहाईच्या मृत्यूनंत तिच्या जुळ्या बहिणीने कोणालाही न सांगता तिच्या मृतदेहावर अंतिम संस्कार केले आणि त्यानंतर वुहाईचं आयकार्ड घेऊन ती कंपनीला कामाला जाऊ लागली. 


वुहाईच्या जुळ्या बहिणीने 2007 पर्यंत म्हणजे निवृत्तीपर्यंत त्या कंपनीत काम केलं. निवृत्तीनंतर नियमानुसार तिला पेन्शन सुरु झालं. 2023 पर्यंत तीने पेन्शनही घेतलं. पण कंपनीच्या तपासणीत एका कागदपत्रामुळे तिचं बिंग फुटलं फसवणूकीचं प्रकरण बाहेर येताच सर्वत्र खळबळ उडाली. कंपनीने या महिलेची पोलिसात तक्रार केली. पोलिसांनी या महिलेला ताब्यात घेतल्यानंतर चौकशीत त्या महिलेने आपला गुन्हा कबूल केला. 


या महिलेला कोर्टात हजर केल्यानंतर कोर्टाने तिला तीन वर्ष जेल आणि आर्थिक दंडाची शिक्षा सुनावली. महिलेकडून 2.92 लाख रुपये दंड म्हणून वसूल करण्यात आले. हे प्रकरण सोशल मीडियावर व्हायरल झालं. पण या प्रकरणावर महिलेला सहानभूती देणाऱ्या प्रतिक्रिया उमटू लागल्यात.


लोकांची सहानभूती
हे प्रकरण सोशल मीडियावर व्हायरल झाल्यानंतर अनेक प्रतिक्रिया उमटू लागल्या आहेत. या महिलेबद्दल सहानभूती व्यक्त केली जात आहे. लोकांच्या मते त्या महिलेने 14 वर्ष केलं. तिने स्वत:ला सिद्ध केलं, मग आता तिच्यावर कारवाई का असं युजर्स विचारतायत. चौदा वर्ष त्या महिलेने इनामे ऐतबार नोकरी केली. केवळ पैशासाठी तिला नोकरी करायची असती तर ती चौदा वर्ष टीकली नसती अशा प्रतिक्रियाही लोकं देतायत.