Canada Cold Video : इथं भारतात यंदाच्या वर्षी अपेक्षित हिवाळा जाणवलाच नाही, असं म्हटलं जात असतानाच जगाच्या एका भागात मात्र आलेल्या हिमवादळानं संपूर्ण देशच थांबवल्याची दृश्य समोर आली आहेत. जास्त थंडी म्हणजे नेमकी किती थंडी? हाडं किंवा रक्त गोठवणारी थंडी नेमकी कशी असते? दाकखिळी बसते म्हणजे नेमकं काय होतं? या प्रश्नांची उत्तरं हवी असल्यास तुम्ही कॅनडातील सद्यस्थितीची दृश्य पाहू शकता. कारण, आर्क्टिक ब्लास्टमुळं (Arctic Blast) सध्या कॅनडामध्ये (Canada Video) थंडीचा कडाका इतक्या गंभीर वळणावर पोहोचला आहे की दैनंदिन जीवनातील कामांवर, वाहतुकीवर आणि जनजीवनावर याचे थेट परिणाम होताना दिसत आहेत. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

बीबीसी या वृत्तसंस्थेनं प्रसिद्ध केलेल्या एका व्हिडीओमुळं कॅनडातील वास्तव समोर आलं आहे. उपलब्ध माहिती आणि वृत्तांनुसार सध्या कॅनडामध्ये थंडीचा कडाका इतका वाढला आहे की, तव्यावर फोडलेलं अंड असो किंवा मग टेबलावर एका Bowl मध्ये ठेवलेले नूडल्स असो सर्वकाही गोठलं आहे. इतकंच काय तर, इथं Tissue आणि टॉयलेट पेपरही गोठला आहे. ही AI जनरेटेड दृश्य नसून कॅनडामध्ये प्रत्यक्षात निसर्गाचं हे रुप पाहायला मिळत आहे. 


हेसुद्धा वाचा : आता काय? 14 दिवसांसाठी 'या' रेल्वे ठप्प; चुकूनही 'इथं' प्रवासाचे बेत आखू नका 


 

 

 

 



 

 

 

 

 

 

 

 

 

 

 

A post shared by BBC News (@bbcnews)


कॅनडामध्ये उकळतं पाणीसुद्धा गोठत आहे. पाण्याचं तापमान जास्त असल्यास ते उणे तापमानामध्ये लगेच गोठलं हा त्याचा शास्त्रीय गुणधर्म असल्यामुलं तिथं हे चित्रसुद्धा पाहायला मिळत आहे. अमेरिकेच्या अल्बर्टा येथील Edmonton भागामध्ये तापमान उणे 43 अंशांवर पोहोचलं होतं. ज्यामुळं येथील नागरिकांना अनेक आव्हानांचा सामना करावा लागला. 


फक्त निवडक भागच नव्हे तर, कॅनडातील टपाल सेवासुद्धा यामुळं प्रभावित झाली असून, सतत पडणारा बर्फ, कडाक्याची थंडी आणि मधूनच गारठा वाढवत बरसणारा पाऊस यामुळं येथील परिस्थिती दिवसागणिक आणखी बिकट होताना दिसत आहे. मेट्रो वँकुवर, वँकुवर आयलंड, न्यूफाऊंजलँडमधील कॉर्नर ब्रूक या ठिकाणांशी असणारा संपर्क तुटला असून, तिथं टपाल विभागाला पोहोचणंही कठीण झालं आहे. स्थानिक हवामान विभागानं वर्तवलेल्या अंदाजानुसार सध्या कॅनडामध्ये ही शीतलहर सुरुच राहणार असून, थेट पुढच्या आठवड्यामध्ये स्थानिकांना या थंडीपासून पाठ सोडवता येणार आहे.