OMG! 64 वर्षांपासून अनुत्तरीत प्रश्न! अस्तित्वात नसलेल्या देशाचा पासपोर्ट दाखवून `गायब` झालेला `तो` कोण?
Viral News : विमानतळावरील `त्या` प्रवाशाकडे अस्तित्वातच नसलेल्या देशाचा पासपोर्ट; जपानमधून अचानक कुठे लुप्त झाला तो?
Viral News : असं म्हणतात की या जगता एकाच चेहऱ्याची सात माणसं असतात. आता ती कधी, कुठे आणि कोणत्या परिस्थितीत असतील हे मात्र ठाऊक नाही. पण, विज्ञान आणि तंत्रज्ञान कितीही पुढे गेलं असलं तरीही या विश्वाची, या जगताली काही रहस्य मात्र अनुत्तरितच आहेत. अगदी 21 व्या शतकातील काही घटनासुद्धा तुमच्या पायाखालची जमीन सरकवतील. अशीच एक घटना साधारण 64 वर्षांपूर्वी जपानमध्ये घडली होती. तो काळ होता 1954 चा.
विमानतळावर नेमकं काय घडलं होतं?
असं म्हणतात की, टोकियोतील Haneda Airport येथे इतर प्रवाशांप्रमाणंच एक व्यक्ती आली आणि तिथं एकच गोंधळ माजला. तो तिथं येण्याच्या काही मिनिटांनंतरच विमानतळावरील अधिकाऱ्यांचे कान टवकारले, कारण त्यानं आपण Taured देशाचे नागरिक असल्याचं स्षष्ट केलं. एक असा देश जो अस्तित्वातच नाही. असं असलं तरीही त्या व्यक्तीकडे असणारी सर्व कागदपत्र अधिकृत होती, त्याच्याकडे असणाऱ्या पासपोर्टवर त्यानं भेट दिलेल्या देशांचे शिक्के होते.
Taured हा देश फ्रान्स आणि स्पेनच्या मध्ये असल्याचं त्यानं सांगितलं होतं. त्याच्या मते हा देश हजार वर्षांहून अधिक काळापासून अस्तित्वात होता. पण, जपानी अधिकाऱ्यांना त्याच्या उत्तरांवर खात्री न पटल्यामुळं त्याला चौकशीनंतर एका अशा हॉटेलमध्ये थांबवण्यात आलं जिथं खिडकी, बाल्कनी नव्हती. त्या खोलीबाहेर खडा पहारा ठेवण्यात आला. पण, इथूनची त्या माणसानं पळ काढला. असंच आतापर्यंतची कथा सांगते.
“Man from Taured”, parallel universe या अशा नावांनी या घटनेबाबत सांगितलं जातं. त्या काळात माध्यमांनी या कथेवर विश्वासही ठेवला. पण, प्रत्यक्षात मात्र हे एक फसवेगिरीचं प्रकरण असल्याची बाब निष्पन्न झाली.
हेसुद्धा वाचा : हातात काठी घेऊन जंगलात अचानक उभा ठाकला विवस्त्र Wolf Man; समोर येताच खळबळ
प्रत्यक्षात काय घडलं?
मुळात हे प्रकरण 1954 नव्हे, तर 1960 मध्ये घडल्याचं सांगण्यात येतं. Snopes.com च्या वृत्तानुसार John Allen Kuchar Zegrus असं त्या इसमाचं नाव असून तो फसव्या मार्गानं विमान प्रवास करत देश बदलत असल्याची माहिती समोर आली. तो जपानमध्ये त्याच्या कोरिअन पत्नीसोबत आला होता. संपूर्ण प्रकरण उघडकीस आल्यानंतर झेगरुसला एका वर्षाच्या कारावासाची शिक्षा सुनावण्यात आली. कारावासादरम्यानच त्यानं तोंडात लपवलेल्या काचेनं दोन्ही दंडांवर वार करण्याचा प्रयत्न केला. तातडीनं त्याला रुग्णालयातही नेण्यात आलं पण, तिथं त्याच्या आयुष्याचा प्रवास थांबला. तो नेमका कुठून आला होता हे आजपर्यंत उलगडू शकलं नसलं तरीही तो अल्जेरियाचा असावा असा कयास अनेकांनीच बांधला. त्याच्या पत्नीचं पुढं काय झालं याचाही थांगपत्ता कुणालाच लागला नाही. थोडक्यात एका रहस्यानं सुरुवात झालेल्या या कथेचाशेवटही रहस्यमयीच झाला.