Taiwan Club Photos Leak : एका क्बलमधले चक्क नग्न महिलेच्या अंगावर डिनर (Dinner) केलं जात असल्याचे फोटो लीक झाल्यानंतर खळबळ उडाली आहे. यात नग्न महिलेच्या अंगावर प्लेटसारखं जेवण वाढलं जातं. यासाठी मॉडल्सला पैसे दिले जातात. जेवण बनवण्यासाठी स्पेशल शेफची नियुक्ती केली जाते. त्यानंतर शेफने केलेले स्पेशल खाद्यपदार्थ मेजवर झोपलेल्या नग्न महिल्याच्या अंगावर (Food served on Woman Naked Body) ठेवले जातात. अशा डिनरची किंमत एका व्यक्तीसाठी जवळपास अडीच लाख रुपये असल्याचं बोललं जातंय. या डिनरचे फोटो लीक झाल्यानंतर आता या क्लबविरुद्ध चौकशीचे आदेश देण्यात आले आहेत. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

हाँगकाँगचा इंग्रजी वृत्तपत्र साऊथ चायना मॉर्निंग पोस्ट यावर रिपोर्ट तयार केला आहे. हा वादग्रस्त क्लब तैवान (Taiwan) इथला आहे. तैवानमधल्या तायचुंग या भागात असणाऱ्या या क्लबमध्ये 'न्योताईमोरी' डिनर नावाचा कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता. या डिनरमध्ये सुशी आणि साशिमी नावाचे खाद्यपदार्थ असतात जे नग्न महिलांच्या शरीरावर सर्व केले जातात. या क्लबमध्ये श्रीमंतां प्रवेश दिला जातो.


फोटो झाला लीक
याचे काही फोटो लीक झाल्यानंतर एकच खळबळ उडाली. या फोटोत एक तरुण महिला मॉडेलच्या नग्न शरीरीवर प्लेटमध्ये सजावट केल्याप्रमाणे काही खाद्यपदार्थ ठेवण्यात आले होते. ही महिला एका मेजवर झोपली होती आणि काही लोकं तिच्या शरीरावचे खाद्यपदार्थ उचलून खाताना दिसत होती. अशा प्रकारच्या डिनरची किंमत प्रती व्यक्ती अडीच लाख रुपये इतकी आहे. यात नग्न मॉडेल आणि जेवणाच्या किंमतीचा समावेश असतो. या डिनरमध्ये मॉडेलला नग्न अवस्थेत जवळपास दोन तास मेजवर दोन तास झोपून राहावं लागतं. रिपोर्टनुसार या डिनरपार्टीत वीस लोकांनी भाग घेतला होता. 


मॉडेलना दिले जातात पैसे
वृत्तपत्राच्या रिपोर्टनुसार या डिनरपार्टीसाठी आयोजकांकडून काही स्थानिक तैवानी मॉडेल्सना पैसे देऊन बोलावलं जातं. ग्राहकांसाठी सुशी आणि साशिमी बनवण्यासाठी स्पेशल शेफ नियुक्त केला जातो. या डिनरपार्टीचे फोटो लीक झाल्यानंतर आता संताप व्यक्त केलाजात असून तैवानच्या सरकारकडून तपास करण्यात आला आहे. या प्रकरणात कोणीही तक्रार केलेली नाही. पण लीक झालेल्या फोटोचा आधार घेत तैवान पोलीस प्रकरणाच्या मुळापर्यंत जाण्याचा प्रयत्न करत आहेत. 


जपानची प्रथा
'न्योताईमोरी' ही मुळची जपानची संकल्पना आहे. 1980 च्या दरम्यान जपानमध्ये नग्न पुरुषांच्या अंगावर जेवण वाढलं जायचं. याला जोरदार विरोध झाला. पण यानंतरही काही ठिकाणी लपूनछपून हे प्रकार सुरुच होते. सार्वजनिक आरोग्याचा विचार करता 'न्योताईमोरी'वर बंदी आणली.