Elon Musk Security Expense : जगातील सर्वात श्रीमंत आणि शक्तीशाली व्यक्तींच्या यादीत एलन मस्क ( Elon Musk) यांचं नाव अव्वल स्थानावर आहे. टेस्ला आणि स्पेसएक्सचे सीईओ असलेले मस्क सोशल मीडियावर चांगलेच सक्रिय असतात. सोशल मीडियावर विविध विषयांच्या पोस्ट ते शेअर करत असतात. एलन मस्क यांनी सोशल मीडिया प्लॅटफॉर्म ट्विटर विकत घेऊन त्याचं नाव X असं ठेवलं. पण तुम्हाला माहित आहे का जगातील या सर्वात श्रीमंत उद्योगपतीची सुरक्षा व्यवस्था कशी आहे? किती बॉडीगार्ड्स त्यांच्या सुरक्षेत असतात आणि त्यांच्या सुरक्षेवर किती खर्च येतो?


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

जगातील सर्वात शक्तिशाली व्यक्तीची सुरक्षा कशी आहे?


एलन मस्क यांची सुरक्षा व्यवस्था (Elon Musk Security) हा नेहमीच चर्चेचा विषय असतो. टेस्ला, स्पेसएक्स आणि एक्स (आधीचं नाव ट्विटर) सारख्या बड्या कंपन्यांचे मालक असलेल्या एलन मस्क यांना अनेकवेळा धमक्याही देण्यात आल्या आहेत. यामुळे त्यांच्या सुरक्षेबाबत 24 तास सतर्कता बाळगण्यात येते.


बाथरुमपर्यंतही असतात बॉडीगार्डस


एलन मस्क यांच्याभोवती नेहमी 20 बॉडीगार्ड्सचं कडं असतं. पावलापावलावर हे बॉडीगार्ड्स मस्क यांच्या सोबत सावलीसारखे असतात. मस्क यांची सुरक्षा इतकी सतर्क आहे की मस्क बाथरुमला जाणार असले तरी बॉडीगार्ड्स बाथरुमपर्यंत त्यांच्या सोबत असतात. मस्क यांच्या सुरक्षा व्यवस्थेला 'वॉयेजर' नाव देण्यात आलं आहे. यात काही बॉडीगार्डच्या हातात शस्त्र असतात तर काही बॉडीगार्डस विना शस्त्राचे असतात. याशिवाय या टीममध्ये एक वैद्यकीय अधिकारी देखील असतो. मस्क यांना कुठेही जायचं असेल तर त्याआधी त्यांची सुरक्षा टीम सर्व प्लानिंग करतात.


सुरक्षा व्यवस्थेवर किती खर्च होतो एलन मस्क यांच्या सुरक्षा व्यवस्थेवर करोडो रुपये खर्च केले जातात. न्यूयॉर्क टाईम्स आणि बिझनेस स्टँडर्डच्या रिपोर्टनासर 2016 मध्ये एका महिन्यात मस्क यांच्या सुरक्षा व्यवस्थेवर 1,63,000 डॉलर म्हणजे भारतीय रुपयात 1.36 कोटी रुपये खर्च करण्यात आले होते. तर 2023 मध्ये हाच खर्च 24 लाख डॉलर म्हणजे भारतीय रुपयात 20 कोटी रुपये खर्च करण्यात आला आहे. 2024 मध्ये यात 5 लाख डॉलरची वाढ झाल्याचं रिपोर्टमध्ये सांगण्यात आलंय.