Human Trafficking : गरीब लोकांना पैशांचं आमिष दाखवत त्यांच्या किडनी (Kidney) विकण्याऱ्या आंतरराष्ट्रीय रॅकेटचा (International Racket) पर्दाफाश झाला आहे. धक्कादायक म्हणजे एक दोन नाही तर तब्बल 328 लोकांच्या किडनी विकल्या गेल्याचं उघड झालं आहे. परदेशात या किडनी विकल्या जात होत्या, तीस ते 1 कोटी रुपयांना एका किडनीचा सौदा केला जात होता. धक्कादायक म्हणजे या रॅकेटच्या प्रमुखाला याआधी पाचवेळा अटक करण्यात आली होती. पण प्रत्येकवेळी  जामीन मिळवून सुटण्यात तो यशस्वी झाला. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

रॅकेटचा पर्दाफश
भारताच्या शेजारचा देश असलेल्या पाकिस्तानात (Pakistan) ही धक्कादायक घटना उघडकीस आली आहे. पाकिस्तान सध्या गरीबीशी झुंजत आहे. पाकिस्तानची जनता गरिबी आणि उपासमारीने त्रस्त आहे. लोकांना दोनवेळचं जेवण मिळणंही मुश्लि झालं आहे. महागाईने कळस गाठला असून सामान्य माणून पार पिचला गेला आहे. पाकिस्तानात परिस्थिती अशी आहे की गरिबीला कंटाळून लोकं किडनी विकत आहेत. लोकांच्या गरिबीचा फायदा घेत तस्कर फसवणूक करत आहेत. पाकिस्तानात 328 जणांची किडनी काढण्यात आल्याची माहिती समोर आली आहे. मोठी गोष्ट म्हणजे एक किडनी प्रत्येकी एक कोटींना विकली जात होती.


याप्रकरणी पाकिस्तान पोलिसांनी पत्रकार परिषद घेत संपूर्ण घटनेची माहिती दिली आहे. रॅकेटच्या प्रमुखाचं नाव फवाद मुख्तार असं आहे. फवाद मुख्तारव याआधीही किडनी विकल्याचा आरोप होता, त्याला याप्रकरणात अटकही करण्यात आली होती. पण राजकीय वरदहस्तामुळे त्याला प्रत्येकवेळी जामीन मिळतो होता. 


8 तस्कारांना केलं अटक
पाकिस्तान पोलिसांनी फवाद मुख्तारसह टोळीतील आठ सदस्यांना अटक केली आहे. गरीबांना पैशांचं आमिष दाखवून त्यांची किडनी काढल जात होती. याबदल्यात त्यांना केवळ काही हजार रुपये दिले जात होते. पण हीच किडनी आरोपी परदेशात लाखो रुपयांना विकत होते. ही टोळी संपूर्ण पाकिस्तानात सक्रिय आहे. धक्कादायक म्हणजे किडनी काढल्याने तीन लोकांचा मृत्यू झाल्याची माहितीही पोलिसांनी दिली आहे. 


असे हेरायचे लोकं
फवाद मुख्तार आणि त्याची टोळी गरीब माणसांना हेरत होती, त्यानंतर त्यांना पैशाचं आमिष दाखवलं जायचं. या लोकांना किडनी काढण्याबाबत कोणतीही माहिती दिली जात नव्हती. कहर म्हणजे या टोळीने एका 14 वर्षांच्या मुलाचीही किडनी काढून विकली होती. आतापर्यंत तीनशेहून अधिक लोकांची किडनी विकल्याचं समोर आलं आहे. प्रत्यक्षात हा आकडा आणखी जास्त असण्याची शक्यता वर्तवली जात आहे.