World Richest Royal Family: तुम्हाला जगातील सर्वात श्रीमंत आणि शाही परिवाराबद्दल माहितीये का? या यादीत एलॉन मस्क, बिल गेट्स किंवा रतन टाटा नव्हे तर सौदी अरेबियातील सर्वात श्रीमंत आणि सगळ्यात प्रभावशाली राजवंशाचे नाव समोर येते. या परिवारातील सर्वात प्रमुख व्यक्ती क्राउन प्रिन्स मोहम्मद बिन सलमान हे आहेत. ते सौदी अरेबियाचे पंतप्रधानदेखील आहेत. 2017 मध्ये क्राउन प्रिन्स म्हणून त्यांची अधिकृत नियुक्ती करण्यात आली. मोहम्मद यांनी त्यांच्या नियुक्तीनंतर सौदीमध्ये अनेक सामाजिक आणि आर्थिक सुधारणा केल्या. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

सौदी अरेबियाच्या शासक शाही कुटुंबाच्या घराला हाऊस ऑफ सौदी असं म्हटलं जातं. यात जवळपास 15,000 सदस्य आहेत. मात्र, त्यातील अधिकांश संपत्ती यातील जवळपास 2000 लोकांजवळ आहे. सौदीच्या या घराची किंमत जवळपास 1.4 ट्रिलियन इतकी आहे. ब्रिटनच्या शाही कुटुंबाच्या एकूण संपत्तीपेक्षा जवळपास 16 टक्के ही संपत्ती अधिक आहे. कुटुंबातील सदस्या अनेकदा धर्मादायांच्या माध्यमातून गरजु लोकांना वाटतात तसंच, सौदीतील नागरिकांनाही मदत करतात. अलीकडेच महिला उद्योजकांसाठी जागतिक बँकेच्या निधीमध्ये देशाने लाखोंचे योगदान दिले आहे.


एलॉन मस्क, बिल गेट्स, रतन टाटा यांची एकुण संपत्तीही कमी 


सौदी शाही परिवार, हाउस ऑफ सौदीची एकूण संपत्ती जगातील एकूण प्रसिद्ध अरबपती एलॉन मस्क, बिल गेट्स, रतन टाटा यांच्या एकूण संपत्ती मिळून आहे. फोर्ब्सच्या रिपोर्टनुसार, टेस्ला आणि स्पेसएक्सचे मालक एलॉन मस्क यांची संपत्ती 251.3 बिलियन डॉलर आहे. तर, मायक्रोसॉफ्टचे संस्थापक बिल गेट्सची एकूण संपत्ती119.6 बिलियन डॉलर इतकी आहे. 


शाही परिवाराचे संस्थापक कोण?


हाऊस ऑफ सौदची अफाट संपत्ती ही त्या काळचा राजा अब्दुलाझीझ इब्न सौदच्या काळात सुमारे सात दशकांपूर्वी राज्यात सापडलेल्या महत्त्वपूर्ण तेलाच्या साठ्यांशी जोडलेली असते. मात्र, अद्याप याला कोणाताही आधार सापडलेला नाही. याच कारणामुळं जगभरातील लोकांचे लक्ष हे सौदी राजघराण्याकडे असते.