दुसऱ्या महायुद्धातील बॉम्बचा 80 वर्षानंतर स्फोट, व्हिडिओ व्हायरल
ब्रिटनची (Britain) राजधानी लंडनमधील (London) एक्स्टर (Exeter) शहरात 900 किलोग्रॅमचा बॉम्ब निकामी (Diffuse) करताना याचा स्फोट घडवून आणला गेला.
लंडन : महायुद्धात (World War) झालेल्या विध्वंसचा प्रतिध्वनी 81 वर्षानंतरही ऐकू आला. ब्रिटनची (Britain) राजधानी लंडनमधील (London) एक्स्टर (Exeter) शहरात 900 किलोग्रॅमचा बॉम्ब निकामी (Diffuse) करताना याचा स्फोट घडवून आणला गेला. पोलिसांना यासंदर्भात माहिती देण्यात आली असता, तपास केल्यानंतर तो दुसऱ्या महायुद्धातील (World War 2) विनाशकारी बॉम्ब असल्याचे पुढे आले. या बॉम्बस्फोटाचा व्हिडिओ सोशल मीडियावर चांगलाच व्हायरल होत आहे.
बॉम्ब स्फोटानंतर परिसरात भीती
एक्स्टर (Exeter) शहरात बॉम्ब असल्याची माहिती मिळाली. एक्झीटर युनिव्हर्सिटीच्या कंपाऊंडमध्ये (Exeter University) शुक्रवारी बॉम्ब दिसला. यानंतर बॉम्ब निकामी करणारे पथक (Bomb Disposal Squad)आणि पोलिसांनी संपूर्ण परिसर रिकामा करण्याचे आदेश दिले. विद्यापीठाच्या 1400 विद्यार्थ्यांसह ग्लेनथोर्न रोड (Glenthorne Road) परिसरात राहणाऱ्या सुमारे 2600 घरांतील रहिवाशांना परिसर रिकामे करण्याच्या सूचना देण्यात आल्या. व्हायरल व्हिडिओ पाहा. (Viral Video).
शुक्रवार आणि शनिवारी सर्वांना या परिसरापासून दूर सुरक्षित ठिकाणी जाण्यास सांगण्यात आले. रविवारी संध्याकाळी 6.10 वाजता हा धोकादायक बॉम्ब रिमोट कंट्रोलद्वारे निकामी करण्यात आला.
10 किलोमीटरपर्यंत मोठा आवाज
बॉम्ब स्फोट इतका शक्तिशाली होता की, त्याचा आवाज सुमारे 10 किलोमीटरपर्यंत ऐकू येत होता. या भीषण स्फोटांमुळे जवळील अनेक घरांच्या भिंती आणि खिडक्या तुटल्या. आता ही घरे धोक्यात असून कधीही पडण्याच्या स्थितीत आहेत. व्हिडिओमध्ये स्फोटाचा ढिगारा उडताना दिसत आहे. बॉम्ब निकामी झाल्यानंतरही लोकांना त्यांच्या घरी परत जाण्याची परवानगी नव्हती.
सैन्याच्या मते दुसर्या महायुद्धात (WW2) बॉम्ब एक्सेटर शहरावर जर्मनीच्या हिटलरच्या नाझी सैन्याने सोडला असावा. त्यांना अशी भीती आहे की परिसरात आणखी असे बॉम्बही असतील. पोलिसांचे म्हणणे आहे की, सुरक्षा ऑडिट केल्यानंतरच लोकांना त्यांच्या घरी जाण्याची परवानगी देण्यात येईल. बॉम्ब निकामी झाल्यानंतर दोन दिवसांनंतरही लोकांना घरी परत येऊ दिले नाही. सध्या तुटलेल्या घरांच्या दुरुस्तीचे काम सुरू आहे. या परिसरात काही ठिकाणी शोध सुरु आहे.