जगातील सर्वात आनंदी देश कोणता? जाणून घ्या...
प्रदीर्घ काळ जाणवत राहणारी थंडी ज्या देशाची विशेषत: आहे तो फिनलँड हा देश जगातील सर्वात आनंदी देश बनलाय.
नवी दिल्ली : प्रदीर्घ काळ जाणवत राहणारी थंडी ज्या देशाची विशेषत: आहे तो फिनलँड हा देश जगातील सर्वात आनंदी देश बनलाय.
जगातील सर्वात आनंदी देश
संयुक्त राष्ट्र संघाच्या एका रिपोर्टमध्ये ही गोष्ट उघड करण्यात आलीय. 'वर्ल्ड हॅप्पीनेस रिपोर्ट'नुसार, १५६ देशांच्या यादीत फिनलँडनं प्रथम क्रमांक पटकावलाय. इथले लोक जगातील इतर देशांच्या नागरिकांच्या तुलनेत अधिक आनंदी आहेत. गेल्या वर्षीच्या रिपोर्टमध्ये फिनलँड पाचव्या स्थानावर होता परंतु, यंदा मात्र हा देश पहिल्या क्रमांकावर आहे.
भारत कितव्या क्रमांकावर
या यादीत भारत मात्र १३३ व्या स्थानावर आहे. तर दहशतवादी राष्ट्र असलेलं पाकिस्तान आणि नेपाळ या देशांतील नागरिक भारतापेक्षा अधिक आनंदी आहेत, असंही या अहवालात म्हटलंय.
शेजारील राष्ट्र कितव्या क्रमांकावर
या अहवालात पाकिस्तान ७५ व्या आणि नेपाळ १०१ व्या स्थानावर आहे. गेल्या वर्षी या यादीत भारत १२२ व्या क्रमांकावर होतं.
भारताचे शेजारी देश चीन ८६ व्या, भूटान ९७ व्या, बांग्लादेश ११५ व्या आणि श्रीलंका ११६ व्या क्रमांकावर आहेत.
'आनंदी' यादीतले पहिले १० देश
फिनलँड
नॉर्वे
डेन्मार्क
आइसलँड
स्वित्झरलँड
नेदरलँड
कॅनडा
न्यूझीलँड
स्वीडन
ऑस्ट्रेलिया