ना बसायला जागा, ना टायलेट तरी लोकं करतात या ट्रेनमधून प्रवास...जाणून घ्या कुठे आहे ही ट्रेन
जगात अशी एक ट्रेन आहे, ज्यात प्रवास करणे सगळ्यात खतरनाक आहे.
Trending News : ट्रेन ही एका ठिकाणाहून दुसऱ्या ठिकाणी जाण्यासाठी सगळ्यात स्वस्त आणि आरामदायक असते. जगभरातील अनेक ट्रेन या आपल्या वैशिष्ट्यामुळे पर्यटकांमध्ये प्रसिद्ध आहेत. लांब पल्ल्याच्या प्रवासासाठी लोकं रेल्वेची निवड करतात. ट्रेनमध्ये मिळणाऱ्या सुविधा प्रवास सुखकर करतात. पण आज आम्ही तुम्हाला अशा ट्रेनबद्दल सांगणार आहोत. जे ऐकून तुम्हाला आर्श्चयाचा धक्का बसेल.
जगात अशी एक ट्रेन आहे, ज्यात प्रवास करणे सगळ्यात खतरनाक आहे. ही मालगाडी आहे पण अनेक लोकं या खतरनाक ट्रेनमधून जीव धोक्यात घालून प्रवास करतात. गेल्या महिन्यात तर एका कपलनं जगातील सर्वात खतरनाक ट्रेनची निवड हनीमूनसाठी केली होती. या अजब गजब हनीमूनचे धक्कादायक फोटो सोशल मीडियावर व्हायरल झाले होते.
का म्हणतात खरतनाक ट्रेन?
'ट्रेन डू डेसर्ट'ची सुरुवात 1963मध्ये झाली असून ही ट्रेन आफ्रिकन देशातील मॉरिटानियामध्ये धावते. तर जगातील सर्वात मोठे उष्ण वाळवंट म्हणजे सहारा वाळवंटातून ही ट्रेन धावते. तसंच ट्रेन 704 किलोमीटरचे अंतर 20 तासांमध्ये पूर्ण करते. तर या ट्रेनची लांबी 2 किलोमीटर असून यात 3 ते 4 डिझेल इंजिन लावले आहेत. ही ट्रेन मॉरिटानिया, नौआधिबू आणि झुएरत या शहरांदरम्यान धावते. या ट्रेनला 200 ते 210 मालवाहू डबे असून फक्त एकच डबा हा प्रवाशांसाठी आहे. तरी देखील अनेक लोकं जीव धोक्यात घालून कच्चा लोहावर बसून प्रवास करतात. या ट्रेनमध्ये तर टॉयलेटची पण सोय नाही.
ही ट्रेन लोकांसाठी लाइफलाइन
या ट्रेनमधून आफ्रिकन देशातील वाळंवटी भागातील लोकांसाठी लाइफलाइन आहे. या ट्रेनमुळे 500 किलोमीटरचा रस्तेवाहतूकपासून लोकांची सुटका होते. तसंच मॉरिटानियाची राजधानी नुआकशॉटला जाण्यासाठी लागणाऱ्या लांब प्रवासही या ट्रेनमुळे टळतो.
त्यामुळे मॉरिटानियातील स्थानिक लोक या खरतनाक ट्रेनमधून प्रवास करतात. विशेष म्हणजे जे लोकं मालवाहू डब्यातून प्रवास करतात त्यांना ट्रेनसाठी पैसा खर्च करावा लागत नाही. मात्र सहारा वाळंवटातून प्रवास करताना प्रवाशांना जवळपास 49 डिग्री सेल्सियस तापमानाचा सामना करावा लागतो. तर रात्रीच्या वेळी तापमान शून्याच्या खालीही जाते. यावरून तुम्ही समजू शकता, या ट्रेनमधून प्रवास करणं किती धोकादायक आहे ते.