टोकियो  : नबी ताजिमा या जगातील सर्वात वृद्ध महिलेचे शनिवारी हॉस्पिटलमध्ये निधन झाले आहे. नबी तजीमा या 117 वर्षांच्या होत्या. सर्वाधिक जगलेल्या तीन व्यक्तींमध्ये नवी ताजिमा यांचा समावेश होतो.    


117 वर्ष जगल्या नबी ताजिमा 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

नबी ताजिमा यांचा जन्म 4  ऑगस्ट 1900 साली झाला होता. त्यांना 7 मुलं आणि 2 मुली होत्या. 117 वर्ष आणि 260 दिवसांनंतर वृद्धपकाळाने नबी ताजिमा यांनी हॉस्पिटलमध्ये अखेरचा श्वास घेतला. 


योशिदा आता सर्वात वृद्ध  


अमेरिका स्थित 'गेरोनोलॉजी रिसर्च ग्रुप'च्या माहितीनुसार, जपान महिला शियो योशिदा सध्या जगातील सगळ्यात वृद्ध महिला आहे. त्यांचं वया 116 वर्ष आहे. अवघ्या काही दिवसात त्यांचा वाढदिवस  असल्याने लवकरच त्याही 117 वर्षांच्या होणार आहेत. 


गिनीज बुक ऑफ वर्ल्डचं सर्टिफिकेट हुकलं 


काही दिवसातच जगातील वयोवृद्ध महिला म्हणून नबी ताजिमा यांंचा बहुमान होणार होता. गिनिक बुक ऑफ वर्ल्ड रेकॉर्ड द्वारा त्यांचा गौरव होणार होता. मात्र आता त्यांंच्या निधनानंतर हा मान पुढील सदस्यांंना मिळणार की ताजिमांंच्या कुटुंंबियांंकडे हे सर्टिफिकेट सुपूर्त केलं जाईल याबाबत अद्याप खुलासा  करण्यात आलेला नाही.