नवी दिल्ली : भारतीय वायुसेनेने पाकिस्तानचे एफ - १६ हे लढावू विमान पाडले आहे. त्याचा पुरावा हाती आला आहे. दरम्यान, पाकिस्तानने आपले कोणतेही विमान भारताने पाडलेले नाही. उलट आम्हीच त्यांची दोन विमान पाडलीत आणि त्यांचे दोन वैमानिक त्याब्यात घेतल्याचा दावा केला होता. त्यातील एका जखमीवर रुग्णालयात उचार सुरु असल्याचे म्हटले होते. मात्र, त्यानंतर त्यांनी आपल्या दाव्यात बदल केला. आम्ही एका वैमानिकाला त्याब्यात घेतले आहे. तर एफ - १६ या लढावू विमानाचा वापर केला नाही, असा दावा केला होता. परंतु पळकुट्या पाकिस्तानचा हाही दावा पोकळ असल्याचे पुढे आले आहे. भारतीय वायुदलाने एफ -१६ हे पाकिस्तानचे लढावू विमान पाडले. त्याचे अवशेष सापडले आहेत. त्यामुळे पाकिस्तान पुन्हा खोटे बोलत असल्याचे पुढे आले आहे. पाकिस्तान हद्दीत एफ - १६ हे विमान पडले आहे. त्याचे अवशेष सापडले आहेत.


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

भारतीय वायुसेनेच्या माऱ्यामुळे कोसळलेल्या पाकिस्तानच्या एफ १६ लढाऊ विमानाच्या अवशेषांचे फोटो जाहीर करण्यात आले आहेत. त्यामुळे पाकिस्तान सैन्याचे प्रवक्ते मेजर जनरल आसिफ गफूर यांनी दिलेल्या खोट्या विधानांची पोल खोल झाली आहे. त्यांनी म्हटले होते की एफ १६ लढाऊ विमान भारतीय हद्दीत गेलेच नाही. कारण त्याचा वापर केला नव्हता. मात्र, भारतीय वायुसेनेने पाडलेल्या विमानाचे फोटो हाती आले आहेत.



पुलवामा दहशतवादी हल्ल्यानंतर भारताने पाकिस्तान हद्दीत घुसून बालाकोट येथील दहशतवादी अड्ड्यावर बॉम्ब हल्ला केला. त्यानंतर पाकिस्तानने दुसऱ्या दिवशी २० विमानांनी भारतीय हद्दीत घुसखोरी केली. यावेळी भारताने चोख प्रत्युत्तर दिले. पाकिस्तानची विमाने पळवून लावली. त्याचवेळी पाकिस्तानचे लढावू एफ १६ हे विमान पाडले. भारतीय हवाई दलाच्या माऱ्यात पाकिस्तानचे एफ१६ विमान कोसळले आणि तुटले. तर त्याच्या पायलटला मात्र पॅराशूटने उतरावे लागले. या विमानाच्या इंजिनाचे फोटो एएनआयने जाहीर केले आहेत. हे पाकिस्तानच्या सेव्हन नॉर्थ इन्फंट्रीचे विमान आहे. हे विमान पडल्यावरचे फोटो प्रदर्शित करण्यात आले आहे.



पाकिस्तानचे मेजर जनल आसिफ गफूर यांनी पाकिस्तानचे काहीच नुकसान झाले नसल्याचे काल स्पष्टीकरण दिले होते. तसेच पाकिस्तानची जी लढाऊ विमाने भारताच्या सीमेत घुसली त्यात एकहा एफ - १६ विमान नव्हते असेही त्यांनी सांगितले होते. पण आता त्या 'नसलेल्या' विमानाचेच फोटो जाहीर झाले असल्यामुळे पाकिस्तानची पोलखोल झाली आहे.