कोट्यावधी रुपयांचा बंगला केवळ ९०४ रुपयांत खरेदी करण्याची संधी
आपलं स्वत:चं आणि हक्काचं घर असावं असं प्रत्येकालाच वाटत असतं. घराचं स्वप्न पूर्ण करण्याची एक चांगली संधी उपलब्ध झाली आहे.
नवी दिल्ली : आपलं स्वत:चं आणि हक्काचं घर असावं असं प्रत्येकालाच वाटत असतं. घराचं स्वप्न पूर्ण करण्याची एक चांगली संधी उपलब्ध झाली आहे.
तुम्हाला आश्चर्य वाटेल पण कोट्यावधी रुपयांचा बंगला केवळ काही रुपयांत मिळत आहे. विश्वास बसत नाहीये ना? पण हे खरं आहे.
बंगला खरेदी करण्यासाठी खास स्पर्धा
२० कोटी रुपये बंगल्याच्या मालकाने एक खास स्पर्धा ठेवली आहे. या स्पर्धेत जर तुमचं नशीब असेल तर तुम्हाला रॉल्स रॉयल कार, जवळपास ४३ लाख रुपयांची रोकड आणि बंगल्यात ठेवण्यासाठी सामान मिळणार आहे. पाहूयात काय आहे ही ऑफर...
इंग्लंडमधील एका व्यक्तीने आपल्या २.३ मिलियन पाऊंड (जवळपास २० कोटी रुपये) चा बंगला विकण्यासाठी एक खास ऑफर काढली आहे. हा बंगला विकण्यासाठी मालकाने एक खूपच खास स्पर्धा आयोजित केली आहे.
असं आहे स्पर्धेचं नाव
या स्पर्धेचं नाव 'विन ए मिलेनियर मैन्शन स्पर्धा' (win a millionaire mansion competition) असं ठेवलं आहे. या स्पर्धेत कुणीही सहभाग घेऊ शकतो.
डेली मेल ने दिलेल्या वृत्तानुसार, या स्पर्धेत सहभागी होणारा व्यक्ती विजेता ठरल्यास त्याला २० कोटी रुपयांचा बंगला, रॉल्स रॉयल कार आणि ५० हजार पाऊंड (जवळपास ४३ लाख रुपये) रोकड मिळणार आहे. यासोबतच बंगल्यात ठेवण्यात आलेल्या वस्तूही दिल्या जाणार आहेत.
अशी आहे खास ऑफर
या स्पर्धेत कुणीही सहभाग घेऊ शकतो. या स्पर्धेत सहभाग घेण्यासाठी बंगल्याच्या मालकाने १०.५० पाऊंड (जवळपास ९०४ रुपये) फी नियोजित केली आहे. बंगल्या विकण्यासाठी ऑफबीट लॉटरी ऑफर ठेवणाऱ्या बंगल्याच्या मालकाला वाटतं की, हा बंगला खरेदी करणाऱ्या व्यक्तीचं आपलं घर करेदी करण्याचं स्वप्न पूर्ण व्हावं.
१९९० मध्ये बनवला होता बंगला
हा बंगला इंग्लंडमधील डेवनमध्ये टिवरटन जवळ बांधण्यात आला आहे. १९९०मध्ये हा बंगला बांधण्यात आला. माझा नातू आणि नात हे या बंगल्यापासून चार तासाच्या अंतरावर राहतात आणि त्यांच्याजवळ मी राहण्यास जात आहे असं बंगल्याच्या मालकाने सांगितलं.
विजेत्याला मिळणार लक्झरी बंगला
बंगला विकण्याच्या स्पर्धेत येणारा पैसा आम्ही एका चॅरीटीसाठी वापरणार आहोत. बंगल्यात ठेवण्यात आलेलं फर्निचर आणि इतर साहीत्यही आम्ही घेऊन जाणार नाही. आम्ही केवळ कपडे आणि इतर काही पर्सनल वस्तू घेऊन जाणार असल्याचं बंगल्याच्या मालकांनी सांगितलं.
असा आहे खास बंगला
बंगल्यामध्ये चार बेडरुम, एक ड्रॉईंग रुप, एक डायनिंग रुम, एक बार रुम, किचन, ब्रेकफआस्ट रुम, जिम आणि एक लायब्ररी आहे. तर, गार्डनमध्ये एक पॉन्ड, गोल्फ कोर्स, स्विमिंग पूल आहे.
स्पर्धेत पराभूत झाल्यासही मिळणार बक्षीस
जर तुम्ही या स्पर्धेत पराभूत झाले तरी काळजी करण्याचं कारण नाही. कारण, स्पर्धेतील ९ रनर-अपला १० हजार पाऊंड (जवळपास ८.६० लाख रुपये) गिफ्ट म्हणून देण्यात येणार आहेत.
एक वर्ष सुरु राहणार स्पर्धा
बंगला खरेदी करण्यासाठी आयोजित स्पर्धा ३० नोव्हेंबर २०१८ पर्यंत चालणार आहे. बंगल्याच्या मालकाला अपेक्षा आहे की, या दरम्यान जवळपास ५ लाख तिकीटं विकली जातील. ज्यामुळे ४५ कोटी रुपये मिळतील. या प्रत्येक तिकीटातील २ पाऊंड (जवळपास १७२ रुपये) चॅरीटीला दिले जातील.