धु्म्रपान करणाऱ्यांचं फुफ्फुस पाहून तुम्हाला ही धक्काच बसेल
सोशल मीडियावर हा व्हिडिओ सध्या चांगलाच व्हायरल होत आहे.
नवी दिल्ली : धुम्रपान करणं किती धोकादायक असतं हे चीनमध्ये डॉक्टरांनी एका रोग्याच्या मृत्यूनंतर त्याचं फुफ्फुस काढल्यानंतर पाहायला मिळालं. जवळपास ३० वर्षापासून हा व्यक्ती धुम्रपान करत होता. त्यामुळे त्याच्या मृत्यूनंतर जेव्हा त्याचे फुफ्फुस डॉक्टरांनी पाहिले तर ते गुलाबीचे पूर्ण काळे झालेले पाहायला मिळाले.
चीनमध्ये डॉक्टरांनी जेव्हा एका व्यक्तीच्या मृत्यूनंतर त्याचे फुफ्फुस पाहिले तेव्हा ते संपूर्ण जळालेल्या स्थितीत असल्या सारखं दिसत होतं. तंबाखूचे कण त्याच्या फुफ्फुसात जमा होत गेल्याने ते संपूर्ण काळे पडले होते. सोशल मीडियावर हा व्हिडिओ सध्या व्हायरल होत आहे. हा व्हिडिओ आतापर्यंत जवळपास 25 मिलियन लोकांनी पाहिला आहे. या व्हिडिओ सोबत रुग्णालयाने एक कॅप्शन देखील दिलं आहे की, 'काय तुम्ही ही धुम्रपान करण्याची हिमंत करु शकता?'
सोशल मीडियावर हा व्हिडिओ समोर आल्यानंतर युजर्स हा सर्वात चांगला धुम्रपान विरोधी जाहिरात असल्याचं बोलत आहेत. चीनमधील जिआंगसु येथील वूशी पीपुल्स रुग्णालयाने ५२ वर्षाच्या व्यक्तीच्या मृत्यूचं कारण जेव्हा शोधण्याचं ठरवलं. तेव्हा त्यांच्या शरीराच्या भागांचा अभ्यास करण्यात आला. या व्यक्तीला फुफ्फुसाचे अनेक रोग लागले होते.
मृत्यू झालेल्या व्यक्तीने मृत्यूनंतर आपले अवयव दान करण्याची इच्छा व्यक्ती केली होती. पण डॉक्टरांनी जेव्हा त्याच्या शरीरांची परिस्थिती पाहिली. तेव्हा याचा काही उपयोग होणार नाही असं त्यांच्या लक्षात आलं.