मुंबई : बॉलीवूड अभिनेत्री झरीन खान ही सध्या चर्चेत आहे. झरीनने माजी मॅनेजरवर गैरवर्तन केल्याचा आरोप केला आहे. FIR केल्यानंतर यावर तपास चालू आहे. हा वाद पैशासाठी झाला होता. तिनं तिच्या मॅनेजरवर आरोप लावला आहे की,  मॅनेजरने तिला वैश्या म्हटलं, त्यानंतर झरीन खान तिच्या वकीलासह पोलीस स्टेशनला पोहचली आणि (IPC) 509 कलमानुसार गुन्हा दाखल केला. अंजली 3-4 वर्षापासून झरीन खानची मॅनेजर होती. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

दोघीं मोबाईलवरून मॅसेज द्वारा बोलत होत्या. ज्यामध्ये अंजलीने वाईट शब्दाचा प्रयोग केला आहे. या दरम्यान अंजलीने तिला वेश्या सुध्दा म्हणून टाकलं. हे प्रकरण आणखी जास्त पेटलं आहे.


झरीनच्या वकीलने एका मुलाखतीत असे म्हटले, मॅनेजर, झरीनची प्रतिमा बिघडविण्याचे काम करत आहे. अंजलीच्या विरोधात FIR करणं गरजेचं होतं. झरीन या गोष्टीवर नाराज आहे. या गोष्टीला ती गंभीरपणे घेत आहे. ती तिच्या प्रतिमेला धक्का पोहचू नये म्हणून काळजी घेत आहे.


झरीननं सुपरस्टार सलमान खानसोबत 2010 मध्ये ‘वीर’ चित्रपटापासून करिअरला सुरूवात केली. सलमान खान सोबत झरीन खान बॉन्डिंग चांगली असल्यानं, तिला साजिद नाडियावालाची मल्टीस्टारर चित्रपट हाऊसफूल 2 मध्ये होती. झरीनने हिंदी व्यतिरिक्त तमिळ आणि पंजाबी चित्रपटात काम केलं आहे.