Tulsi Puja : सकाळी तुळशीची पूजा करताय? `हे` 5 नियम जरूर पाळा!
तुळशीचं पूजन करताना काही चुका केल्या तर यामुळे तुम्हाला नुकसान होऊ शकतं.
मुंबई : सनातन धर्मात पुजली जाणारी तुळशी अनेक औषधी गुणधर्मांनी परिपूर्ण मानली जाते. याला जेवढं धार्मिक महत्त्व आहे, तेवढंच महत्त्व आयुर्वेदातही आहे. तुळशीची पानं तोडणं, तिला पाणी अर्पण करणं, पूजा करण्याचे अनेक नियम धार्मिक ग्रंथांमध्येही सापडतात. भगवान शिव यांना वगळून तुळशीचा उपयोग जवळजवळ प्रत्येक हिंदू देवतांच्या पूजेत केला जातो.
तुळशीमध्ये लक्ष्मीचा वास असल्याचं मानतात. यासाठीच विष्णूंची पूजा तुळशीभोगाशिवाय अपूर्ण मानली जाते. अशा वेळी तुळशीची पूजा करताना काही गोष्टी लक्षात ठेवणं अत्यंत महत्त्वाचं आहे. पूजन करताना काही चुका केल्या तर यामुळे तुम्हाला नुकसान होऊ शकतं. त्यामुळे आज आपण तुळशीला पाणी घालण्याच्या नियमांबद्दल जाणून घेणार आहोत.
तुळशीला पाणी घालण्याचे 5 नियम
तुलशीला पाणी अर्पण करण्यापूर्वी कोणत्याही प्रकारचं अन्न ग्रहण करु नये.
धार्मिक शास्त्रानुसार, तुळशीला पाणी अर्पण करताना न शिवलेले कपडे घालण्याचा सल्ला दिला जातो.
सूर्योदयाच्या वेळी तुळशीला पाणी अर्पण करणं उत्तम मानले जाते. अंघोळ केल्याशिवाय कोणत्याही व्यक्तीने तुळशीला जल अर्पण करू नये.
तुळशीच्या रोपाला पाणी घालत असताना ते गरजेपेक्षा जास्त असून याकडे विशेष लक्ष द्यावे. इतर कोणत्याही गोष्टींकडे त्यावेळी लक्ष देऊ नये.
रविवारी आणि एकादशीला तुळशीच्या रोपाला पाणी अर्पण करू नये. असे मानले जातं की, एकादशीच्या दिवशी तुळशीमाता भगवान विष्णूसाठी निर्जला व्रत करते.
(विशेष सूचना: इथे दिलेली माहिती सामान्य माहितीवर आधारित आहे. झी 24 तास याची कोणतीही खातरजमा करत नाही. आमचा उद्देश फक्त तुम्हाला माहिती देणं आहे.)