टँकर माफियांकडून होतोय डबक्यातल्या पाण्याचा पुरवठा

टँकर माफियांकडून होतोय डबक्यातल्या पाण्याचा पुरवठा

वसईतले टँकर माफिया लोकांच्या जीवाशी खेळ करत आहेत. पाहुयात 'झी 24 तास'च्या कॅमेऱ्यात कैद झालेला हा सगळा धक्कादायक प्रकार...

व्हॉटसअॅपवर चॅट करताय... सावधान!

व्हॉटसअॅपवर चॅट करताय... सावधान!

तुमचं व्हॉटसअॅपवरचं चॅट कुणी वाचतंय का? हे एकदा तपासून पाहा... तुम्ही व्हॉटसअॅपवरुन एखाद्याशी काय संवाद साधता, हे कदाचीत दुसरंच कुणीतरी वाचत असण्याची शक्यता आहे, असं होऊ नये म्हणूनच पाहा आमचा हा 'विशेष रिपोर्ट'...

'स्वतंत्र विदर्भा'बद्दल पवारांच्या वक्तव्यावर तिखट प्रतिक्रिया

'स्वतंत्र विदर्भा'बद्दल पवारांच्या वक्तव्यावर तिखट प्रतिक्रिया

बुधवारी, पुण्यात झालेल्या 'शोध मराठी मनाचा' या कार्यक्रमात राष्ट्रवादीचे ज्येष्ठ नेते शरद पवार यांनी 'वेगळा विदर्भ हे अमराठी नेतृत्वाचं स्वप्न असल्याचं' आपल्या मुलाखतीत म्हटलं होतं. यासाठी 'वेगळा विदर्भ'वाद्यांनी तिखट प्रतिक्रिया नोंदवलीय. 

गोव्याच्या विधिमंडळात पर्रिकर सादर करतायत अर्थसंकल्प

गोव्याच्या विधिमंडळात पर्रिकर सादर करतायत अर्थसंकल्प

गोव्याचे मुख्यमंत्री मनोहर पर्रिकर थोडयाच वेळात अर्थसंकल्प सादर करणार आहेत.

...जेव्हा ठाकरेंनी पवारांना पेचात पकडण्याचा प्रयत्न केला!

...जेव्हा ठाकरेंनी पवारांना पेचात पकडण्याचा प्रयत्न केला!

महाराष्ट्राकडे पाहताना, ज्याचं नाव घेतल्यावर सर्व समाजातील लोक एकत्र येतील असा महाराष्ट्राचा 'हूक' काय वाटतो, या राज ठाकरेंच्या प्रश्नावर 'छत्रपती शिवाजी' असं उत्तर द्यायला शरद पवारांना वेळ लागला नाही. 'शोध मराठी मनाचा' या कार्यक्रमात राज ठाकरे शरद पवार यांची जाहीर मुलाखत घेत होते. 

राज ठाकरेंचा 'रॅपिड फायर' आणि पवारांची फटकेबाजी

राज ठाकरेंचा 'रॅपिड फायर' आणि पवारांची फटकेबाजी

'जागतिक मराठी अकादमी'च्या शोध मराठी मनाचा या कार्यक्रमानिमित्तानं एक अनोखा योग जुळून आला. या मंचावर चक्क शरद पवार यांना 'रॅपिड फायर' प्रश्न विचारण्याची संधी राज ठाकरेंना मिळाली...

'मुंबई महाराष्ट्रापासून कुणीही तोडू शकणार नाहीत'

'मुंबई महाराष्ट्रापासून कुणीही तोडू शकणार नाहीत'

महाराष्ट्रापासून मुंबई वेगळी करण्याचं सत्ताधारी भाजपचं षडयंत्र आहे का? असा प्रश्न राज ठाकरेंनी जाहीर मंचावर शरद पवार यांना विचारला... त्यावर पवारांनीही, हे 'षडयंत्र' असल्याचं मान्य केलं. 

देशाला 'खुळखुळा' करणारे ९३३९ कर्जदार... 'एसबीआय' येणार गोत्यात?

देशाला 'खुळखुळा' करणारे ९३३९ कर्जदार... 'एसबीआय' येणार गोत्यात?

नीरव मोदी पंजाब नॅशनल बँकेत ११,५०० करोड रुपयांचा घोटाळा करून पसार झालाय. विजय माल्या एसबीआयसमवेत इतर बँकांचे ८००० करोड रुपये घेऊन पळाला. विक्रम कोठारीलाही कर्ज देऊन अनेक बँका फसल्यात... ही काही उदाहरण आहेत जे आत्तापर्यंत समोर आलेत. परंतु, देशाला खुळखुळा बनवणाऱ्यांमध्ये तब्बल ९३३९ कर्जदारांचा समावेश आहे. या लोकांनी भारतीय बँकांचे तब्बल १ लाख ११ हजार ७३८ करोड रुपये जाणूनबुजून रखडवलेत. 

'नीरव मोदीसोबत फोटो काढताना प्रोटोकॉल आडवा येत नाही?'

'नीरव मोदीसोबत फोटो काढताना प्रोटोकॉल आडवा येत नाही?'

शिवस्मारक आणि मॅग्नेटिक महाराष्ट्राच्या मुद्यावरून शिवसेनेच्या प्रवक्त्या आणि आमदार नीलम गोऱ्हे यांनी भाजपवर टीका केलीय. 

'सिद्धीविनायक' ट्रस्टींच्या मौजमजेवर लाखोंची उधळपट्टी

'सिद्धीविनायक' ट्रस्टींच्या मौजमजेवर लाखोंची उधळपट्टी

मुंबईच्या प्रभादेवी येथील सिद्धिविनायक मंदिर ट्रस्टच्या माजी विश्वस्तांनी प्रवास खर्च आणि खाण्या-पिण्यांवर लाखो रूपयांचा खर्च करत मोठी उधळपट्टी केली असल्याचा आरोप 'हिंदू विधीज्ञ परिषदे'चे अध्यक्ष वीरेंद्र इचलकरंजीकर यांनी केलाय. त्यामुळं सरकारनं या प्रकरणाची चौकशी करावी, अशी मागणी त्यांनी केलीय.