डॉ. मधु निमकर यांची ‘मिसेस कॉन्फिडन्ट’ म्हणून निवड
मुंबई मराठी पत्रकार संघ (Mumbai Marathi Patrakar Sangh) येथे आयोजित ‘क्वीन ऑफ साऊथ मुंबई २०२० सीजन टू’ (Queen of South Mumbai 2020 Season Two) या सौंदर्य स्पर्धेची (Beauty contest) अलिकडेच सांगता झाली.
मुंबई : मुंबई मराठी पत्रकार संघ (Mumbai Marathi Patrakar Sangh) येथे आयोजित ‘क्वीन ऑफ साऊथ मुंबई २०२० सीजन टू’ (Queen of South Mumbai 2020 Season Two) या सौंदर्य स्पर्धेची (Beauty contest) अलिकडेच सांगता झाली. दक्षिण मुंबईमधून अनेक सौंदर्यवतीनी या स्पर्धेमध्ये सहभाग घेतला होता. सामाजिक, सांस्कृतिक आणि साहित्य क्षेत्रामध्ये कार्यरत असणाऱ्या डॉ. मधु निमकर (Madhu Nimkar) यांची या स्पर्धेत ‘मिसेस कॉन्फिडन्ट’ म्हणून (Mrs. Confident) निवड करण्यात आली. त्यांचे अभिनंदन करण्यात येत आहे.
कोविड-१९ वातावरणात आपल्यातला आत्मविश्वास डळमळू न देता टाळेबंदीच्या प्रतिकूल परिस्थितीमध्ये गृहिणीने आत्मविश्वासाने कसे सामोरे जावे याचे प्रत्यक्ष उदाहरण साहित्यिक मधु निमकर यांनी आपल्या कृतीतून दर्शविले, असे याप्रसंगी मान्यवर जजेसनी नमूद केले.
‘मिसेस कॉन्फिडन्ट’ निवड झाल्यानंतर डॉ. मधु निमकर यांनी सांगितले, साहित्य, कला, संस्कृती, क्रीडा, सामाजिक, शैक्षणिक क्षेत्रात काम करताना याचा उपयोग झाला आहे. आपण आत्मविश्वास आणि प्रोत्साहन युक्त दिलेले उत्तर या स्पर्धेसाठी उपयुक्त ठरले. लॉकडाऊनमध्ये दुर्दैवाने पूर्णवेळ घरकामाला जुंपल्यामुळे सगळ्या महिला स्वतःवर प्रेम करायला विसरल्या आहेत. हे दुष्टचक्र मोडून आता आपण कात टाकायची वेळ आलेली आहे. कोविडच्या अनुषंगाने प्रत्येकाच्या आयुष्यात, राहणीमानात, आणि प्रत्येक गोष्टीतच बदल झालेले आहेत. बदल हा सृष्टीचा नियमच आहे. परंतु या बदलातून सकारात्मकतेचा विचार केला पाहिजे. मलाही एक संधी मिळाली आहे.