PHOTO : खालून जहाजं अन् पाण्याच्या वरून धावणार ट्रेन; भारतातील पहिला सी लिफ्ट ब्रिजमुळे 1 तासाचा प्रवास येणार 20 मिनिटांवर

India First vertical sea Lift Bridge : भारतातील पहिला आणि जगातील दुसरा व्हर्टिकल सी लिफ्ट ब्रिज प्रवासासाठी सज्ज झालाय. लवकरच खालून जहाजं अन् पाण्याच्या वरून ट्रेन धावणार आहे. ज्यावेळी या ब्रिज समोर भलामोठा जहाज येईल तेव्हा हा ब्रिज त्याचा स्वागतात खुला होणार आहे. 

| Dec 27, 2024, 21:08 PM IST
1/7

भारतातील पहिला वर्टिकल लिफ्ट सी ब्रिज जो तामिळनाडू ते रामेश्वरमला जोडणार आहे तो तयार झालाय. हा पंबन रेल ब्रिज (Pamban Rail Bridge) वर जगातील दुसरा वर्टिकल लिफ्ट सी ब्रिज आहे.   

2/7

पंबन रेल्वे पुलाच्या लिफ्ट स्पॅनमध्ये तीव्र वाकणे हे रेल्वे विकास निगम लिमिटेडने बांधलाय. खास तंत्रज्ञानाच्या मदतीने हा ब्रिज बनवण्यात आला आहे. हा पूल 2.05 किलोमीटर लांबीचा असून 19.3 मीटरचे 100 स्पॅन आणि 63 मीटरचा अनोखा नेव्हिगेशनल स्पॅन यात आहेत. 

3/7

हा पूल बांधण्यासाठी इलेक्ट्रो-मेकॅनिकल कंट्रोलिंग सिस्टिमचा वापर केला गेलाय. या पुलाची निर्मिती जुन्या पांबन पुलाशेजारी बांधण्यात आलाय. या पुलावरून ताशी 80 किलोमीटर वेगाने ट्रेन धावणार आहेत. हा वेग जुन्या पुलावर ट्रेनच्या ताशी फक्त 10 किमी जास्त आहे. 

4/7

या ब्रिजमुळे खालून जहाज आणि वरुन रेल्वे धावणार आहे. त्यासोबत मोठ्या सागरी जहाजांच्या ये जासाठी हा ब्रिज काही भाग 17 मीटरपर्यंत उंच उघडणार आहे.   

5/7

इलेक्ट्रो-मेकॅनिकल नियंत्रित प्रणालीद्वारे चालणारा हा पूल आता हाताने उघडण्याची गरज भविष्यात भासणार नाहीय. जहाज आल्यावर पुलाचा काही भाग वर जाणार आहे. खरं तर यापूर्वी हा ब्रिज उघडण्यासाठी 40 जणांची मदत लागायची.  

6/7

या पुलाच्या निर्मितीमुळे रामेश्वरमला जाणे आता कमी वेळेचे होणार आहे. रामेश्वरम इथले जगप्रसिद्ध रामनाथस्वामी मंदिरात दर्शनासाठी जाणाऱ्या यात्रेकरूंना आता प्रवासासाठी कमी वेळ लागणार असल्याने पर्यटकांची संख्या वाढण्याची शक्यता वर्तविण्यात आलीय. 

7/7

पंबन पुलाच्या बांधकामामुळे मंडपम ते रामेश्वरममधील अंतरही केवळ 20 मिनिटांवर येणार आहे. पुलावरून जाणाऱ्या गाड्यांची सुरक्षितता लक्षात घेऊन अलार्म यंत्रणाची सोय करण्यात आलीय. ताशी 58 मीटर वेगाने वारे वाहत असल्यास, स्वयंचलित इशारा सिग्नल जारी करण्यात येईल ज्यामुळे ट्रेनला इशारा मिळेल आणि त्या ट्रेनला थांबवण्यात येईल.