मुंबई : गणेशोत्सव हा मोठ्या उत्साहात साजरा होणार सण. यंदाच्या वर्षी गणेश चतुर्थीला नवी 'तुतारी' वाजणार आहे. आणि ही 'तुतारी' आहे गायक शंकर महादेवन यांच्या आवाजातील 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

समीर सामंत लिखित तुतारी हे गाणं भाविकांना एक वेगळाच उत्साह देणार आहे. हे गाणं आता नुकतंच मराठी आणि हिंदीमध्ये लाँच झालं आहे. या गाण्यात मोठ्या प्रमाणात तुतारी या वाद्याचा वापर केला आहे. या गाण्यावर गणरायाच्या आगमनाला आणि विसर्जनाच्यावेळी नक्की ठेका धरायला भाग पाडणार आहे. 



याबाबत शंकर महादेवन सांगतात की, गणेश चतुर्थी हा सण माझ्या अगदी जवळचा आहे. हा उत्सव माझ्यासाठी आनंद, प्रेम आणि भरपूर उत्साह घेऊन येतो. आणि यंदा हा आनंद द्विगुणीत करण्यासाठी मी तुतारी हे गाणं बाप्पाच्या चरणी अर्पण करत आहे. या गाण्यात पहिल्यांदाच ताशा आणि डबस्टेपचा मिलाप आपल्याला पाहायला मिळणार आहे. हे गाणं हिंदी आणि मराठीमध्ये देखील आहे. मराठीत ऐकण्यासाठी क्लिक करा. 


तसेच या गाण्यात आपल्याला शंकर महादेवन यांनी ठेका धरताना देखील दिसत आहे. हंगामा आणि कॅनवास याचे पार्टनर आहे. तसेच समीर सामंत यांनी हे गाणं लिहिलेलं आहे.