Ashadhi Ekadashi 2023 : देव माझा विठू सावळा 
माळ त्याची माझिया गळा...


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

विठू राहे पंढरपुरी, वैकुंठच हे भूवरी, 
भीमेच्या काठी डुले भक्तीचा माळ


साजिरे रूप सुंदर, कटी झळके पितांबर
कंठात तुळशीची हार, कस्तुरी टिळा 


भजनात विठू डोलतो, कीर्तनी विठू नाचतो
रांगुनी जाई पाहुनी, भक्तीचा लळा...


विठुरायाचे सावळे रुप डोळ्या सामावून घेण्यासाठी लाखो वारकरी इंद्रायणी काठी एकत्र जमले आहेत. आषाढी एकादशीला महाराष्ट्रात अतिशय महत्त्व आहे. आषाढी एकादशीलाच देवशयनी एकादशी असं म्हणतात. गुरुवारी 29 जूनला आषाढी एकादशीचं व्रत पाळलं जाणार आहे. (ashadhi ekadashi 2023 june 29 muhurta puja vidhi and importance of devshayani ekadashi Pandharpur maharashtra)


प्रत्येक महिन्यात दोन एकादशी असतात म्हणजे वर्षाला 24 एकादशी असतात. पण यंदा चातुर्मास म्हणजेच अधिमास आल्यामुळे दोन एकादशी जास्त येणार आहे. पंचांगानुसार आषाढ महिन्याच्या शुद्ध पक्षाला येणाऱ्या एकादशीला आषाढी म्हणजेच देवशयनी एकादशी असं म्हणतात.  या दिवशी भगवान श्री विष्णूंची पूजेला विशेष महत्त्व आहे. 


देवशयनी एकादशीचे महत्त्व (Importance of Devashyani Ekadashi)


हिंदू धर्मात अशी मान्यता आहे की, मानवाची एक वर्ष ही देवांची एक अहोरात्र असते. तर दक्षिणायन ही देवाची रात्र तर उत्तरायण ही देवाचा दिवस असतो. कर्क संक्रांतीला उत्तरायण पूर्ण होऊन दक्षिणायनला सुरुवात होते. म्हणजे देव झोपी जातात असं म्हणतात. म्हणून या एकादशीला देवशयनी एकादशी असं म्हणतात.


आषाढी एकादशी मुहूर्त 


आषाढी एकादशी 29 जूनला पहाटे 3:18 वाजता सुरु होणार असून 30 जूनला दुपारी 2:42 वाजेपर्यंत असणार आहे. उदय तिथीनुसार एकादशी 29 जूनला साजरी करण्यात येणार आहे. 


आषाढी एकादशीची पूजाविधी


आषाढी एकादशीला ब्रह्ममुहूर्तावर उठून स्नान करावं. त्यानंतर विष्णू आणि विठुरायाला तुळस वाहून पूजा करुन व्रत करण्याचं संकल्प घ्यावा. विठ्ठल नामाचा जयघोष करत पूर्ण दिवस देवाच्या नामस्मरण करावं. पंढरपूरमध्ये यादिवशी असणारे वारकरी विठ्ठलाची आरती करुन विठुरायाचा भक्तीत दंग होतात. असं म्हणतात या दिवशी म्हणजे दशमीच्या अहोरात्र तुपाचा दिवा देखील लावावा. 


 

 

 

 



 

 

 

 

 

 

 

 

 

 

 

A post shared by Viha Sadgir (@babyviha30)


आषाढी एकादशीची कथा


पुरातन काळापासून आषाढी एकादशीची ही कथा सांगण्यात येते. त्या म्हटलं आहे की, सत्ययुगात मांधाता नावाचा चक्रवर्ती सम्राट होता. त्याचा राजात प्रजा आनंदी राहायची. पण त्या राज्यात एक वेळ अशी आली की, सलग तीन वर्षे पाऊस पडला नाही. प्रजेवर संकट कोसळलं, राजाही अस्वस्थ झाला. एकेदिवशी यावर उपाय शोधण्यासाठी राजा जंगलात निघून गेला. जंगलात वनवन भटकत असताना त्याला अंगिरा ऋषींचं आश्रम दिसलं. 


 

 

 

 



 

 

 

 

 

 

 

 

 

 

 

A post shared by Mandve Amol (@mandve.a)


राजाने ऋषीकडे व्यथा मांडली. त्यावर राजाला ऋषीने उपाय सुचवला. ते म्हणाले की, राज्यात जाऊन देवशयनी एकादशीचं व्रत खऱ्या मनाने आणि विधिपूर्वक करा. त्यामुळे राज्यात नक्की पाऊस पडेल. राजा राज्यात परतला आणि त्याने हे व्रत नियमानुसार केलं. त्यानंतर संपूर्ण राज्यात चांगला पाऊस झाला. तेव्हापासून वरुणराजाला खूष करण्यासाठी हे व्रत पाळलं जातं आहे.