थर्टी फर्स्टला तळीरामांची चांदी! दारू अन् बिअर, पबबद्दल सरकारी मोठी घोषणा

Maharashtra Liquor Sale Update : नव्या वर्षाचं स्वागत करण्यासाठी सर्वच जण सज्ज झाले असून सरकारने 24, 25 आणि 31 डिसेंबरसाठी महत्त्वाची घोषणा केलीय. 

| Dec 23, 2024, 22:07 PM IST
1/7

31 डिसेंबरला थर्टी फर्स्ट जल्लोषात साजरा करून रात्री बाराच्या ठोक्याला नव्या वर्षाचं स्वागत केलं जातं. लाखो लिटर दारू अन् बिअर रिचवली जाते. राज्य सरकारने महत्त्वाचे घोषणा केलीय. 

2/7

नवीन वर्षाच्या स्वागताच्या निमित्ताने राज्यातील दारुची दुकाने, पब, बार पहाटेपर्यंत सुरू राहणार आहेत. 

3/7

पण कायदा आणि सुव्यवस्था, सार्वजनिक शांततेचा विचार करून परवानगी नाकारण्याचा अधिकार जिल्हाधिकाऱ्यांना आहे असेही स्पष्ट करण्यात आलंय. 

4/7

24,25 आणि 31 डिसेंबर या दिवशी पहाटेपर्यंत दारू मिळणार आहे. बिअर/वाइन विकणाऱ्या दुकानांना मध्यरात्री 1 वाजेपर्यंत विक्री करता येणार आहे.

5/7

या आदेशानुसार 24, 25 आणि 31 डिसेंबर या दिवशी दारू दुकानांची वेळ वाढवण्यात आली आहे. दारुची दुकाने रात्री 1 वाजपेर्यंत तर पब आणि बार यांना पहाटे पाच वाजेपर्यंत मद्यविक्री करण्याची परवानगी देण्यात आली आहे. 

6/7

थर्टी फर्स्टला पोलिसांचा चोख बंदोबस्त असतो. या काळात कायदा सुव्यवस्था राखताना पोलिसांची चांगलीच दमछाक होते. 

7/7

आता तर सरकारनेच पहाटेपर्यंत दारू विक्रीची परवानगी दिल्याने पोलिसांचा कामाचा ताण आणखीच वाढणार आहे.