Ashadhi Ekadashi Recipes In Marathi : महाराष्ट्रात विठुरायाचे भक्त आपली भक्त दाखवण्यासाठी आषाढी एकादशीला (Ashadhi Ekadashi 2023) उपवास करतात.  महाराष्ट्रातील प्रत्येक जण आषाढी एकादशीला दुपारी आणि रात्रीच्या जेवणात उपवासाचे पदार्थ खात असतो. त्याच्यासाठी खास स्वदिष्ट उपवासाच्या पदार्थांचे तुमच्यासाठी आहे. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

जे भक्त आषाढीला पंढरपुरात जाता आले नाही, पण अनेकजण घरात राहून एकादशीचे व्रत करुन विठू माऊलीकडे प्रार्थना करतात. यंदा तुम्ही देखील आषाढी एकादशीचे व्रत करणार असाल तर जाणून घ्या या उपवासानिमित्त तुम्ही घरच्या घरी कोणत खास पदार्थ बनवून एकादशीचे व्रत पाळू शकता. उपवास म्हटलं की आपण केवळ फलहार आणि दूध पितो. परंतु तुम्हाला ते शक्य नसेल तर या व्रताच्यानिमित्त तुम्ही घरच्या घरी काही उपवासाचे पदार्थ बनवू शकता. तुमच्यासाठी काही खास पाककृती एकादशीनिमित्त... 


उपवासाला रताळी का खावीत?


रताळ्याद्वारे आपल्याला आरोग्य आणि चव दोन्ही मिळते. हिवाळ्यात आणि पावसाळ्यात रताळी खाणे आरोग्यासाठी फायदेशीर मानले जाते. रक्तदाबाची समस्या, मधुमेह यात रताळे खाणे फायदेशीर असून, अशक्तपणा दूर करण्यासाठी डॉक्टर रताळे खाण्याचा सल्ला देतात. बीटरूटमध्ये जीवनसत्त्वे अ आणि अ, खनिजे, बीटा कॅरोटीन आणि पोटॅशियम मोठ्या प्रमाणात असतात.  रताळ्यामध्ये भरपूर फायबर असते, त्याचा वापर पचनासाठी फायदेशीर असतो. म्हणूनच उपवासाच्या वेळी रताळ आणि रताळ्याचे पदार्थ खाण्याला विशेष महत्त्व आहे. 


रताळ्याची खीर


रताळ्याची खीर बनवण्यासाठी 3-4 मध्यम आकाराचे रताळे, अर्धा लिटर दूध, अर्धा कप साखर, 1 चमचे हळद, 1 चमचे बारीक चिरलेले बदाम आणि अर्धा चमचा वेल्ची पावडर घ्या. 
यासाठी आधी रताळी स्वच्छ धुवुन पुसुन घ्यावीत. रताळी छिलून साल काढून मग किसून घ्यावीत. एका कढईत एक चमचा तूप घालून ते गरम करावे. त्यात रताळ्याचा किस टाकून दोन-तीन मिनिटे परतून घ्या. नंतर त्यात दूध टाकून शिजू द्यावे. यात घातलेले दूध अर्धं होवु द्यावे. मग त्यात साखर, बदामाचे काप, वेलची पावडर घालावी. खीर ढवळून घ्यावी मग गॅस बंद करा आणि खीर थंड होऊ द्या.


वाचा: ग्राहकांनो खरेदीची करा घाई! सोने-चांदीचा दर घसरला, जाणून घ्या आजचा भाव


रताळ्याचे कबाब


कबाब बनवण्यासाठी दोन मध्यम आकाराचे उकडलेले रताळे, दोन मध्यम आकाराचे उकडलेले बटाटे, एक इंच लसूण, बारीक चिरलेली कोथिंबीर, 2 बारीक चिरलेल्या हिरव्या मिरच्या, अर्धा टीस्पून काळी मिरी पावडर, अर्धा टीस्पून जिरेपूड, अर्धा टीस्पून सैंघव मीठ घ्यावे. 
कबाब बनवण्यासाठी आधी उकडलेले रताळे आणि बटाटे सोलून मग ते कुस्करुन घ्यावेत. पॅनमध्ये दोन चमचे तेल घाला. ते गरम झालं की कुस्करलेली रताळी आणि बटाटे घालून मिश्रण चांगलं परतून घ्यावे. नंतर त्यात सैंधव, जिरेपूड, मीर पावडर, किसलेलं आलं, चिरलेल्या मिरच्या आणि कोथिंबीर घालावी. हे सर्व एकजीव करुन घ्यावे. या मिश्रणाचे छोटे छोटे गोळे करावेत. एक नॉनस्टिक पॅन गरम करुन त्यावर थोडे तेल सोडावे. रताळ्याचे कबाब शेकण्यासाठी त्यावर ठेवावे. हे कबाब दोन्ही बाजुंनी छान सोनेरी रंग येईपर्यंत शेकून घ्यावेत. शॅलो फ्राय करण्याऐवजी तेलात तळून घेतले तरी चालतात. पण आरोग्याचा विचार केला करता रताळ्याचे कबाब उत्तम आहेत. 


रताळ्याचा पराठा


रताळ्यापासून बनवलेला पराठा हा उपवासाला शरीराला ऊर्जा देणारा असतो.  रताळ्याचा पराठा करण्यासाठी अर्धा किलो रताळ, 200 ग्रॅम शिंगाड्याचं पीठ, 200 ग्रॅम राजगिर्या पीठ, साजूक तुप आणि वेल्ची पावडर घ्या.
पराठे बनवताना रताळी उकडून घ्यावीत. मग ती सोलुन कुस्करुन घ्यावीत. कढईत थोडं तूप घालून मंद आचेवर कुस्करलेरी रताळी परतावीत. परताना खमंग वास सुटला की त्यात वेलची पावडर त्यात टाकून मिश्रण थंड होऊ द्यावे.
तोपर्यंत पराठ्यांसाठी लागणारे पीठ मळून घ्यावे. त्यासाठी शिंगाड्या आणि राजगिऱ्याची पीठ एकत्र करुन पाण्याने मळून घ्यावे. आणि ते एका छोट्या लाटीच्या छोट्या पोळीत भरावे. बटाट्याच्या पराठ्याप्रमाणे रताळ्याचा हा पराठा शेकून घ्यावा. शेकताना पराठ्यावर तेल किंवा तूप सोडा. पण पराठे तुपावर शेकल्याने ते आरोग्यदायी होतात आणि खमंगही लागतात. 


रताळ्याचं चाट


रताळ्याचा चाट तयार करण्यासाठी 4 रताळे, गोड, चिमूटभर सैंधव गोड, अर्धा चमचा काळी मिरी पावडर, अर्धा चमचा लाल तिखट, एक चमचा चाट मसाला, चिरलेली कोथिंबीर आणि अर्धा लिंबाचा रस घ्या.
सर्वात आधी रताळी उकडून थंड होवून द्यावीत. मग रताळी सोलून ती गोल गोल आकरात कपवित. त्यावर चवीनुसार साध गोड, सैंधव मीठ, मिरा पुड, लाल तिखट आणि चाट मसाला घाला. हलक्या हाताने रताळ्याच्या फोडी हलवून सर्व मसाले छान एकत्र करुन घ्यावेत. एका ताटात रताळ्याचे चाट काढून त्यावर लिंबाचा रस घालावा. पुन्हा रताळ्याच्या फोडी हलवून घ्याव्यात. शेवटी त्यावर कोथिंबीर पेरावी.