ग्राहकांनो खरेदीची करा घाई! सोने-चांदीचा दर घसरला, जाणून घ्या आजचा भाव

Gold Silver Price Today :  जागतिक बाजारात सोन्या आणि चांदीच्या किमतीत दबाव पाहायला मिळत असताना भारतीय सराफ बाजारात ही सोने-चांदीच्या किंमतीत चढउतार होत आहे. जागतिक  घडामोड आणि देशांतर्गत मागणीच्या जोरावर आज, बुधवारी सोने-चांदीच्या दरात घसरण झाली आहे. 

Jun 28, 2023, 11:51 AM IST
1/7

gold silver price on 28 june 2023

इंडियन बुलियन ज्वेलर्स असोसिएशनचे संकेतस्थळानुसार, सोने चांदीच्या दरात सलग चार दिवसांपासून घसरण कायम आहे. त्यानुसार आज सोन्याच्या दरात 79 रुपयांची घसरण झाली आहे. 

2/7

gold silver price on 28 june 2023

आज (28 जून 2023 ) सोन्याची 10 ग्रॅम 24 कॅरेटची किंमत 58,210 रुपये असून मागील व्यवहारात मौल्यवान धातूची किंमत प्रति 10 ग्रॅम 58,680 रुपयेवर बंद झाली.  

3/7

gold silver price on 28 june 2023

सराफा बाजार या वेबसाइटनुसार चांदी 69,670 रुपये प्रति किलोने विकली जात आहे. मागील व्यवहारात चांदीचा भाव 69,800 रुपये प्रति किलो होता. 

4/7

gold silver price on 28 june 2023

सराफा बाजाराच्या वेबसाइटनुसार मुंबईत 22 कॅरेट सोन्याची किंमत 53,359 रुपये प्रति 10 ग्रॅम आहे. तर 24 कॅरेट सोन्याची किंमत 58,210 प्रति 10 ग्रॅम आहे.

5/7

gold silver price on 28 june 2023

पुण्यात 22 कॅरेट सोन्याच्या प्रति 10 ग्रॅमचा दर 53,359 रुपये आणि 24 कॅरेट सोन्याचा दर 58,210 रुपये आहे.

6/7

gold silver price on 28 june 2023

नागपुरात 22 कॅरेट सोन्याचा प्रति 10 ग्रॅमचा दर 53,359 रुपये आणि 24 कॅरेट सोन्याचा दर 58,210 रुपये आहे. 

7/7

gold silver price on 28 june 2023

नाशिकमध्ये 22 कॅरेट सोन्याचा दर 53,359 रुपये आणि 24 कॅरेट सोन्याचा प्रति 10 ग्रॅमचा दर 58,210 रुपये आहे.