चैत्राली राजापुरकर, झी मीडिया, पुणे : आषाढी वारीच्या (Ashadhi wari 2023) निमित्ताने  हिंदू - मुस्लीम ऐक्याचे दर्शन घडले आहे. हिंदू - मुस्लीम ऐक्याचे प्रतिक असलेले हजरत अनगड शाह बाबा दर्ग्यावर मानाची पहिली आरती संपन्न झाली. डोळ्यांचे पारणे फेडणारा गुरु शिष्य भेटीचा सोहळा पाण्यासाठी मोठी गर्दी झाली होती. 


350 वर्ष जूनी पंरपंरा


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

हिंदू - मुस्लीम ऐक्याचे दर्शन घडवणऱ्या या भेटीला 350 वर्ष जुनी परंपरा आहे. इनामदार वाड्यातून पालखी पंढरपूरकडे मार्गस्थ झाल्यानंतर हिंदू - मुस्लीम एक्याचे प्रतिक असलेले हजरत अनगड शाह बाबा दर्गा येथे मानाची पहिली आरती होते. काही वेळासाठी येथे पालखी विसावा ही करण्यात येतो. लाखो वारक-यांच्या साक्षीने संपन्न झालेल्या या दर्गा येथील पालखीच्या आरती सोहळयात लाखो हिंदू-मुस्लीम भाविकांच्या डोळयाचे पारणे फेडले. 


देहूतील अनगडशहा बाबा हे संत तुकाराम महाराजांचे शिष्य मानले जातात


देहूतील अनगडशहा बाबा हे संत तुकाराम महाराजांचे शिष्य मानले जातात. त्यामुळे गुरू-शिष्य भेट झाल्यानंतरच तुकोबांची पालखी पंढरपूर कडे मार्गस्थ होते. या पारंपरिक सोहळयानंतर देहुतिल ग्रामस्थांनि पाणावलेल्या डोळयांनी तूकाराम महाराजांच्या पालखीला निरोप दिला. 


आळंदीत आजानबागेत ज्ञानेश्वरीचं पारायण 


संत ज्ञानेश्वर माऊली यांचा पालखी प्रस्थान सोहळा आज होतोय वारकऱ्यांची मान द्यावी या आळंदीत आपल्याला पाहायला मिळते. वारकरी जेव्हा आळंदीत येतात तेव्हा ते ज्ञानेश्वर माऊलींच्या समाधीचे दर्शन तर घेतात. मात्र, या ठिकाणी असणाऱ्या अजान वृक्षाचे देखील नम्र होऊन दर्शन घेत असतात. याच आजान बागेच्या परिसरात वारकरी ज्ञानेश्वरी ग्रंथाचे पारायण करत असतात. अशी मान्यता आहे की संत ज्ञानेश्वर माऊली यांनी जेव्हा समाधी घेतली तेव्हा त्यांनी आपल्या सोबत एक दंड ठेवला होता. कालांतराने त्या लाकडी दंडाला आणि त्यांच्या मुळ्या माऊलींना टोचू लागल्या यांचा दृष्टांत एकनाथ महाराज यांना झाला. पुढे एकनाथ महारांजानी ती मुळी मंदिरा शेजारी लावली. त्याच मुळीतून उगवलेल्या वृक्षाला आजान वृक्ष म्हणतात. वारकऱ्यांची अशीही धारणा आहे की जेव्हा वारकरी या वृक्षाच्या सावलीत बसून ज्ञानेश्वरी वाचतात तेव्हा ज्याला लिहिता वाचता येत नाही तो सुद्धा ज्ञानेश्वरी स्पष्ट वाचू शकतो. 


हिंगोलीतील औंढा नागनाथ नगरीत संत शिरोमणी नामदेव महाराजांच्या दिंडीचे आगमन


हिंगोली जिल्ह्यातील नर्सी नामदेव येथील श्रीसंत शिरोमणी नामदेव महाराजांच्या दिंडीचे आज औंढा नागनाथ येथे आगमन झाले. भाविकांनी मोठया श्रद्धेने नामदेव महाराजांच्या पालखीचे दर्शन घेतले,यावेळी ''ज्ञानोबा तुकाराम'' च्या जयघोषाने औंढा नगरी दुमदुमून गेली. औंढा नागनाथ शहरातून श्री संत शिरोमणी नामदेव महाराजांची दिंडी जवळा बाजारकडे रवाना झाली.