राहुल गांधींनी निळ्या रंगाचं टीशर्ट घालून दिला अनोखा संदेश; काय आहे नेमकं प्रकरण?
काँग्रेस नेता आणि खासदार राहुल गांधी आज परभणीत सोमनाथ सूर्यवंशी यांच्या कुटुंबाच्या भेटीला आले होते. यावेळी त्यांनी निळ्या रंगाचा टीशर्ट घातला होता. कायमच पांढऱ्या रंगाच टीशर्ट घालणाऱ्या राहुल गांधी यांच्या निळ्या रंगाच्या टीशर्ट मागचं कारण काय?
Rahul Gandhi Blue T Shirt : डॉ. बाबासाहेब आंबेडकरांवरील वक्तव्यावरून गुरुवारी संसदेत प्रचंड गदारोळ झाला. भाजप आणि काँग्रेसने एकमेकांवर गुंडगिरी आणि मुद्द्यांपासून विचलित केल्याचा आरोप केला. दरम्यान, राहुल गांधींचा निळा टी-शर्ट चर्चेचा विषय ठरला.
राहुल गांधी नेहमी पांढऱ्या टी-शर्टमध्ये दिसतात, मात्र गुरुवारी संसदेत आणि आज परभणी सोमनाथ सूर्यवंशी यांच्या कुटुंबियांच्या भेटीला जाताना राहुल गांधी निळ्या रंगाच्या टीशर्टमध्ये दिसतात. यावरुन डॉ.आंबेडकर आणि दलित समाजाशी आपले नाते दाखवण्याचा प्रयत्न राहुल गांधी करत आहेत.