Aprajita Flower Farming: अपराजिताच्या फुलांची शेती करा आणि तिप्पट नफा कमवा
शेतकऱ्यांसाठी नवीन असे पर्याय देखील आता उपलब्ध होत आहेत. जेणेकरुन त्यांना पर्यायी पीक घेता येईल.
पोपट पिटेकर, झी मीडिया, मुंबई : शेतकरी आता शेतात विविध प्रयोग करताना दिसून येतोय. त्यातचं देशातील शेतकऱ्यांमध्ये औषधी पिकांची लागवड अधिक लोकप्रिय होताना दिसत आहे. कारण सरकार सुगंध मिशन अंतर्गत या पिकांच्या लागवडीस प्रोत्साहन देत आहे. अपराजिताचे पीक (Aprajita Flower Farming) हे कोणत्याही वातावरणात घेता येते.
उष्मा ते दुष्काळ अशा परिस्थितीत चांगले अपराजिताचे पीक विकसित होतं. विशेष म्हणजे माती आणि हवामानाचा त्यावर परिणाम होत नाही. त्यामुळे शेतकरी आता या पिकांच्या लागवडीकडे वळताना पाहायला मिळतोय. भारता व्यतिरिक्त अमेरिका, आफ्रिका, ऑस्ट्रेलिया आणि चीन यांसारख्या देशांमध्ये याची लागवड मोठ्या प्रमाणावर केली जाते.
लागवड कशी करावी?
अपराजिताच्या लागवडीपूर्वी बियाण्यांवर प्रक्रिया करुन घेतली जाते. पेरणी हे 10 सेमी अंतरावर आणि अडीच ते तीन सेमी खोलीवर करावी. कारण अपराजिताचे पीक उष्मा ते दुष्काळ अशा परिस्थितीत चांगलं विकसित होतं. माती आणि हवामानाचा त्यावर विशेष परिणाम होताना दिसत नाही.
अपराजिता अनेक रोगांवर फायदेशीर
अपराजिता हे पिक ब्लू टी मधुमेहासारख्या आजारांवर खूप फायदेशीर आहे. या वनस्पतीचा उर्वरित भाग पशुखाद्य म्हणून देखील वापर करु शकता. जिथे मटार आणि बीन्सचा वापर अन्न बनवण्यासाठी केला जातो. त्याच वेळी, त्याच्या फुलांपासून निळा चहा देखील बनविला जातो. म्हणजेच काय तर एक पीक, तीन नोकऱ्या आणि तिप्पट नफा असचं या पिकाचं फायदा म्हणावं लागेल.
किती उत्पादन मिळेल?
अपराजिताच्या फुलांची काढणी वेळेत करणं गरजेचं आहे. अन्यथा झाडांची फुल खाली पडून खराब होऊ शकतात. जर तुम्ही एक हेक्टरमध्ये अपराजिताच्या फुलांची लागवड केली. तर तुम्हाला 1 ते 3 टन चारा आणि 95 ते 160 किलो बियाणे प्रति हेक्टर प्रमाण मिळू शकतात. त्याची फुलं आणि उत्पादन अनेक देशांमध्ये निर्यात केली जाऊ शकते. त्यामुळे तुम्हीही अपराजिताच्या लागवडीतून चांगला नफा सहज मिळवू शकता.