मुंबई : रस्त्यावरुन चालत असतांना अनेकांना मोबाईलवर बोलण्याची सवय असते. मोबाईल हा तसा आता अती आवश्यक साधन झालं असलं तरी काही गोष्टी करतांना सावधता बाळगणं गरजेचं असतं. आपल्याच आजुबाजुला आणि आपल्या समोर अशा अनेक घटना घडत असतात तरी आपण बेसावध असतो. रस्त्यावरुन चालत असतांना फोनवर बोलणं किंवा मोबाईल हातात ठेवून चालणं अनेकांना भारी पडलं आहे. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

आजवर आपण अनेक घटना आपल्या डोळ्यांनी पाहिल्या असतील की, कशाप्रकारे हातातून मोबाईल हिसकावून नेला जातो. तुमचं लक्ष नसतं पण मागून बाईकवरुन येणारे चोर तुमच्यावर लक्ष ठेवून असतात. त्यांना संधी मिळताच ते तुमच्या हातातला मोबाईल हिसकावून फरार होऊन जातात. तुम्हाला त्यांचा पाठलाग करण्याची संधी देखील मिळत नाही.


मुंबई सारख्या शहरात ही गोष्ट आता मोठ्या प्रमाणात वाढत आहे. चेन स्नॅकर्स प्रमाणेच बाईकवर स्वार होऊन चोरटे तुमच्या मागून येतात आणि तुमच्या हातातून तुमच्या समोर तुमचा मोबाईल हिसकावून नेतात आणि अशा वेळी तुम्ही काहीच करु शकत नाही.


अनेकदा तर कानाला हेडफोन लावून गाणे ऐकत चालण्याची सवय अनेकांना असते. अशा वेळेत दुर्घटना होण्याचं प्रमाण मोठ्या प्रमाणात वाढते. अनेक घटना तर आपण आपल्या डोळ्यांसमोर देखील पाहिल्या असतील. त्यामुळे रस्त्यावरुन चालत असतांना मोबाईलवर बोलणे टाळलं पाहिजे. त्यामुळे तुमचा महागडा फोन तुमच्या समोर तुमच्याकडून कोणीतरी हिसकावून घेऊन जावू शकतो.