वाढदिवसानिमित्त यशच्या 'टॉक्सिक'चा टीझर रिलीज, घेतलंय तब्बल इतकं मानधन; ठरला पहिलाच खलनायक!

सुपरस्टार यशने त्याच्या 39 व्या वाढदिवसानिमित्त त्याच्या चाहत्यांना एक खास भेट दिली आहे. त्याच्या आगामी 'टॉक्सिक' चित्रपटाचा टीझर रिलीज झाला आहे. 

| Jan 08, 2025, 16:51 PM IST
1/7

यशचा 39 वा वाढदिवस

यश 8 जानेवारीला त्याचा 39 वा वाढदिवस साजरा करत आहे. वाढदिवसानिमित्त त्याने त्याच्या चाहत्यांना एक खास भेट दिली आहे. 

2/7

'टॉक्सिक'चा टीझर रिलीज

यशच्या आगामी 'टॉक्सिक' चित्रपटाचा टीझर रिलीज झाला आहे. ज्यामध्ये तो दमदार लूकमध्ये दिसत आहे. टीझरमुळे चित्रपटाविषयीची उत्सुकता आणखी वाढली आहे. 

3/7

दमदार लूक

या टीझरमध्ये कोणताही संवाद नाहीये. फक्त संगीत ऐकायला मिळत आहे. त्यासोबतच तो आलिशान कारमधून खाली उतरत सिगार ओढत क्लबमध्ये प्रवेश करताो. 

4/7

रिलीज डेट

अद्याप 'टॉक्सिक'च्या निर्मात्यांनी प्रदर्शनाची तारीख जाहीर केलेली नाहीये. याआधी हा चित्रपट 10 एप्रिलला प्रदर्शित होणार असल्याचं म्हटले जात होते. मात्र, आता त्याचे प्रदर्शन लांबण्याची शक्यता आहे. 

5/7

स्टारकास्ट

चित्रपटातील स्टारकास्टबद्दल अद्याप कोणतीही माहिती समोर आलेली नाही. कियारा आणि नयनतारा चित्रपटात असू शकतात असा अंदाज आहे. मात्र, अक्षय ओबेरॉयच्या नावाची अधिकृत घोषणा झालीये. 

6/7

सर्वाधिक मानधन घेणारा खलनायक

मीडिया रिपोर्ट्सनुसार, यशला 'रामायण' या चित्रपटासाठी 200 कोटी रुपये मानधन देण्यात येणार आहे. यामुळे तो भारतीय चित्रपटसृष्टीत सर्वाधिक मानधन घेणारा खलनायक ठरणार आहे. 

7/7

सहनिर्माता

यश हा नितेश तिवारीच्या 'रामायण' चित्रपटात तो सहनिर्माता आणि अभिनेता असणार आहे. तो रावणाच्या भूमिकेत दिसणार आहे.