रबाडाची एक शिवी आणि विराटने १५ सेकंदात सेट केला मॅचचा निकाल
विराटला दिलेली शिवी कशी सुसाईडची गोळी ठरू शकते याचा अंदाज दक्षिण आफ्रिकेला केपटाऊन वन डेमध्ये आला असेल. मॅचचा हिरो विराट कोहलीला बनला तर व्हिलन बनला रबाडा... याच्या अति जोशाने आफ्रिका संघाचे होश उडविले.
प्रशांत जाधव, झी मीडिया, मुंबई : विराटला दिलेली शिवी कशी सुसाईडची गोळी ठरू शकते याचा अंदाज दक्षिण आफ्रिकेला केपटाऊन वन डेमध्ये आला असेल. मॅचचा हिरो विराट कोहलीला बनला तर व्हिलन बनला रबाडा... याच्या अति जोशाने आफ्रिका संघाचे होश उडविले.
सामन्याच्या १५ व्या चेंडूवर रबाडाने विराटच्या पॅडवर चेंडू टाकला. तो पॅडला लागल्यामुळे रबाडाने अपील केली. अंपायरने बोट वर कर विराटला बाहेर पाठवण्याचा निर्णय दिला. भारताच्या ड्रेसिंग रूममध्ये शांतता पसरली. पण १५ सेकंदानंतर विराटने DRSची अपील केली आणि यानंतर इतिहास बदलण्याचा शंखनाद झाला.
विराटच्या डोळ्यासमोर रबाडाची शिवी घुमत होती. १५ सेकंदामध्ये मैदानात असे काही घडले. त्यानंतर विराटमधील ज्वाळांना आणखी भडका उडाला. या ओव्हरमध्ये विराटने जोरदार चौकार लगावला. पण रबाडा काही ऐकत नव्हता. विराटला त्याने अनेकवेळा छेडले. कधी बाऊंसर टाकले, कधी विराटला स्टंप समजून थ्रो केला. कोहलीने रबाडाच्या प्रत्येक कुरापतीचे उत्तर हसून आणि बॅटने दिले.
विराटने केपटाऊनमध्ये १६० धावांची नाबाद खेळी केली. यात त्याने ३४ वा शतक झळकावले. कोहलीने डावाचा पहिला चौकारही रबाडाला लगावला आणि शेवटचाही चौकार रबाडालाच... मैदानावर विराट आपल्या जोशाने समोरच्यावर दबाब टाकतो आणि केपटाऊनमध्ये विराटचे हसू आफ्रिकेला अधिक वेदना देत होत.
जितका विराट हसत होता तितका दक्षिण आफ्रिकेचा आत्मविश्वास डळमळीत होत होता. मॅचचा निकाल विराटने १५ सेकंदात सेट केला, नंतरचे सहा तास आफ्रिका संघ रबाडाच्या शिवीवर अश्रू ढाळत होती.