नागा चैतन्य पाठोपाठ सावत्र भावाचा साखरपुडा, नागार्जुनने शेअर केलं सुनेचे रोमँटिक PHOTO, कोण आहे जैनाब रावदजी?

Akhil Akkineni Engaged to Zainab Ravdjee : नागार्जुन अक्किनेनी यांचा धाकटा मुलगा आणि नागा चैतन्याचा सावत्र भाऊ अखिल अक्किनेनीचा साखरपुडा झाला आहे. मुलगा आणि सुनेचे रोमँटिक नागार्जुनने सोशल मीडियावर शेअर केले आहेत. कोण आहे नागार्जुनची होणारी सून जैनाब रावदजी पाहूयात. 

| Nov 26, 2024, 22:09 PM IST
1/8

प्रसिद्ध तेलुगू अभिनेता नागा चैतन्य दुसऱ्यांदा लग्न बंधनात अडकणार आहे. अभिनेत्री सोभिता धुलिपालाशी येत्या 4 डिसेंबरला तो विवाह करणार आहे. मोठ्या भावापाठोपाठ लहान भावानेही आनंदाची बातमी दिलीय. 

2/8

नागार्जुन अक्किनेनी यांचा धाकटा मुलगा अभिनेता अखिल अक्किनेनीनेचाही साखरपुडा झालाय. अखिल आणि नागार्जुनने सोशल मीडियावर ही आनंदाची बातमी दिलीय. 

3/8

नागार्जुनने धाकटा मुलगा आणि होणारी सून जैनाब रावदजीचे रोमँटिक फोटो सोशल मीडियावर शेअर केले आहेत. अखिलचा हा दुसरा साखरपुडा आहे. 

4/8

जैनाब ही एक जीवनशैली ब्लॉगर आहे, जी स्किनकेअरसाठी काम करते. जैनाब आणि अखिल यांची भेट 2 वर्षांपूर्वी झाली होती. मैत्री आणि त्यानंतर हे दोघे प्रेमात पडेल. त्यांचा साखरपुडा खाजगीत करण्यात आला. कुटुंब आणि काही जवळचे लोक उपस्थितीत होते. तर जैनाबला लाइमलाइटपासून दूर राहणे आवडते. म्हणून तिचं इंस्टाग्राम खाजगी आहे. 

5/8

जैनाब हिचा जन्म हैदराबाद झाला. तिथेच ती लहानाची मोठी झाली. सध्या ती मुंबईत राहते. जैनब 27 वर्षांची असून ती एक प्रतिभावान कलाकार आहे. ती अप्रतिम चित्रे आणि कलेसाठी ओळखला जाते. आतापर्यंत अनेक मोठ्या प्रदर्शनांमध्ये तिचे चित्रे प्रदर्शित झाली आहेत.

6/8

अखिलचा जन्म हा 8 एप्रिल 1994 मध्ये अमेरिकेत झाला. 1995 मध्ये वडील नागार्जुन यांच्या 'सिसिंदरी' चित्रपटात तो बालकलाकार म्हणून झळकला होता. 

7/8

8 वर्षांपूर्वी अखिल 22 वर्षांचा असताना त्याचा साखरपुडा श्रिया भुपलशी झाला होता. लग्नाच्या काही दिवसांपूर्वी हैदराबाद विमानतळावर त्या दोघांचं जोरदार भांडण झालं होतं. त्यानंतर हे लग्न मोडलं. 

8/8

नागार्जुनचं पहिलं लग्न लक्ष्मी दग्गुबतीशी झालं होतं. त्यानंतर दुसरं लग्न अभिनेत्री अमला अक्किनेसोबत झालंय. नागार्जुनला पहिल्या लग्नापासून नागा चैतन्य आणि दुसऱ्या लग्नापासून अखिल हा मुलगा आहे. अखिल आणि नागा हे सावत्र भावंड आहेत.