दयाशंकर मिश्र : स्वप्न पाहणं साधी सोपी सवय आहे. लहानपणापासूनच ठरवा, आपल्याला नेमकं काय करायचं आहे. येथे तर काही वर्षात वेगवेगळ्या, नको नको त्या शाळा उघडतील.


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

जी मुलं जन्माआधी, आणि जन्मानंतर आणि नर्सरीला पोहोचल्यानंतर, त्यांच्या गुणांच्या शोधात गुंतलेले असतात. हे सर्व काही यासाठी होत आहे. कारण आपण आपल्या मुलांच्या नावाखाली चंद्रावर जाण्याचं स्वप्न पाहत आहोत.


मुलांपेक्षा जास्तच जास्त ताणतणावात त्यांचे आईवडील आहेत, कारण त्यांना एक चिंता आहे की, त्यांचा मुलगा मागे पडू नये. तो इतरांच्या तुलनेत मागे राहू नये. या जमान्यात त्याला असंख्य मुलांशी स्पर्धा करायची आहे. 


प्रसिद्ध डॉक्टर मित्रांनी सांगितलं की, सध्या महिलांमध्ये चिंता, तणाव आणि चिडचिडेपणा यांचा मुलांच्या आरोग्याशी मोठा संबंध आहे. एवढंच नाही, तर झोप न येणे, याशिवाय चिंतेमुळे थॉयराईड वाढण्याचं काम मोठ्या प्रमाणात होत आहे.


स्वप्न दोन प्रकारची असतात, जे तुम्ही तुमच्या स्वत:साठी पाहतात. आपली नोकरी कशी असावी. तुम्हाला त्या बदल्यात मिळणारं स्टेटस, रक्कम कशी असावी.


दुसरी गोष्ट जे स्वप्न तुम्ही मुलांच्या नावाने पाहतात. तुम्हाला असं वाटतं की, तुमच्या मुलाने असं काही तरी करावं की, तुमच्या शेजाऱ्याने आणि दूर गावात राहणाऱ्या तुमच्या मुलाने याचा विचार देखील करू नये. यासाठी मुलांबाबत स्वप्न पाहिलं जातं.


पहिली गोष्ट तशी फार नियंत्रणात आहे, कारण ती तुमच्या क्षमतेवर अवलंबून आहे. ज्या विषयी तुम्हाला काही दिवसात माहित होतं. आता यात आणखी एखादी गोष्ट आहे जी, तुम्हाला भ्रमात ठेवत असेल. केवळ कल्पनाच लोक करत बसतात. तर यामुळे तणावाचे ढग जीवनावर रेंगाळतात, होत काहीच नाही.


यावेळी समाजात पहिल्यापेक्षा जास्त दुसऱ्या स्वप्नाचं संकट ओढवलेलं आहे. डिअर जिंदगी, या सदरात आपण सतत शाळा की शिक्षा, संस्कार, आणि दृष्टीकोन यावर प्रश्न उपस्थित करत आहोत.


शाळा स्वप्नांचा कारखाना झाली आहेत, जेथे टॉपर्स, हुशार मुलं जन्माला घालण्याचा असा काही प्रयत्न केला जातो की, आपणही त्या मायाजालात गुंतत जातो. 


शाळेच्या चार वर्षाच्या मुलाच्या डोक्यात, आपले विचार थोपवण्याचं काम आपण एवढ्या हुशारीने करतो की, चांगले, मोठे, समजदार लोक या गुंत्यात येतात.


ते लवकरचं मुलाच्या खराब होणाऱ्या भविष्याच्या डोहात बुडत जातात. ते विसरून जातात की, वस्तूंना मोठं करण्यात वेळ लागतो.


हा लेख मुंबईमधून लिहिला जात आहे, सोमवारी संध्याकाळी मला शिवाजी पार्कच्या मैदानात, नेट्स. मैदानात फिरण्यासाठी काही वेळ मिळाला. 


कधी तरी शेकडो मुलांमध्ये 'भारत रत्न' सचिन तेंडुलकरने, आपल्या अथक सरावात कितीतरी सकाळ, संध्याकाळ येथे सराव केला असेल.


आपण भारतीय क्रिकेटवर प्रेम तर नेहमीच करत आलो आहोत, पण खेळण्यातून जीवनासाठी शिकलो काहीच नाहीत. खेळ खेळण्यात, जे धैर्य, निष्ठा पाहिजे. त्याचं १० टक्के देखील सार जीवनात उतरवला, तरी स्वप्नांचं वादळ आपल्याला डगमगवू शकत नाही.


चिंता काय असते, त्या नाविकाला विचारा, ज्याची नौका, वादळात फसली असेल. तो चिंतेत राहत नाही, तर प्रयत्न करण्यात असतो. जो तो करू शकतो, करत राहतो. उरलं सुरलं तो नियतीवर सोडून देतो.


दुसऱ्या आणि शहरी, मध्यमवर्गीय, नोकरीपेशातील समाजाची मुलं, मुलांच्या नावाखाली आपलं स्वप्न पाहत असतात. ते त्यांच्यासह मुलांच्या देखील जीवनावर न कळत ग्रहण लावत असतात.


स्वप्नांच्या मागे जर समजदारीची धग नसेल, तर ती स्वप्न विझून जातील. स्वप्न विखरू शकतात, त्या दरम्यान त्यांना सांभाळणं फार कठीण होवून बसतं.


अशावेळी जेवढं शक्य असेल, स्वप्न पाहतात, नेहमी यथार्थवादी आणि ठोस असणं गरजेचं आहे. या सोबत स्वप्न योग्य आचेवर ठेवलं, तर जीवनाचा स्वाद कायम राहिल.


ईमेल : dayashankar.mishra@zeemedia.esselgroup.com


पता : डिअर जिंदगी (दयाशंकर मिश्र)
Zee Media, वास्मे हाऊस, प्लॉट नं. 4, 
सेक्टर 16 A, फिल्म सिटी, नोएडा (यूपी)


(लेखक 'झी न्यूज़'चे डिजिटल एडिटर आहेत)  (https://twitter.com/dayashankarmi)
(आपले प्रश्न आणि सूचना इनबॉक्‍समध्ये लिहा: https://www.facebook.com/dayashankar.mishra.54)