डियर जिंदगी : असा एक मित्र तर असलाच पाहिजे...
आपण `मित्र` आणि `शुभचिंतक` यांना एकच मानतो, पण दोघांच्या मनाचा रंग अगदी वेगळा आहे, शुभचिंतक आपल्या `शुभ` गोष्टींचा चिंतक आहे, तर मित्र `ऋतू`सारखा `सदाबहार` आहे.
दयाशंकर मिश्र : डिअर जिंदगीच्या युवा वाचकांना मैत्रीवरून अनेक प्रश्न विचारले आहेत. यात जास्तच जास्त सारांश असाच आहे की, कुणावर किती विश्वास ठेवावा. मित्राची ओळख कशी होते. जीवनाच्या या स्पर्धेत या छोट्या गल्लीत, आपल्याला नेहमी वाटतं की, एका वेळेस दोन जण या गल्लीत चालूच शकत नाहीत. पण तसं नाहीय. जर आपण आतल्या आत उदार, विश्वासी आहात, तर कुणालाही हा छोट्याशा गल्लीत, किती तरी लोकांसोबत तुम्ही चालू शकता.
दोस्तीवर एवढ्या, कहाण्या आणि किस्से आहेत की, सांगण्यासाठी कोणताही एक किस्सा निवडणे कठीण आहे. पण काही दिवसाआधी मला श्री रावी यांचा सर्वोत्तम लघुकथा संग्रह मिळाला. यात एकापेक्षा एक लघुकथा आहेत. यातील एक लघुकथा तुम्हाला सांगतोय, मी या लघुकथेला थोडक्यात सांगणार आहे.
एका गुरूकुलमधून ३ ग्रॅज्युएट निघाले, ज्यात एक तरूणी आणि दोन तरूण होते. या तीनही तरूणांमध्ये फार जवळची मैत्री होती. ही कथा अशा काळातली आहे, ज्यावेळी मुलं आणि मुलींची मैत्री समाजाकडून स्वीकारली जात नव्हती. तीन जणांनी एक वेगळंच ठरवलं की, आपण तीनही जणांनी नोकरी करायची नाही. एक शिक्षक झाला, दुसरा व्यापारी आणि त्या तरूणीने कलेचं क्षेत्र निवडलं.
सर्वकाही ठिक ठाक सुरू होतं, तेव्हा शहरात अफवा परसली की, या तरूणीला कुणाशी तरी प्रेम झालं आहे. या काळात प्रेम म्हणजे एक अपराधच होता. एका प्रतिष्ठेचं मानलं जाणारं गुरूकूलच्या मुलीचं प्रेम समाजासाठी एक कलंक असल्यासारखं होतं, समाज त्यांची तिला काय शिक्षा देईल, हे सांगणं कठीण होतं.समाजातील मोठ्या ज्येष्ठांनी गुरूजनांसमोर हा मुद्दा ठेवला. तरूणीसोबत त्या तरूणीलाही स्पष्टीकरण देण्यासाठी बोलवण्यात आलं.
या तरूणीला आपल्या गुरूकुलमधील जवळच्या मित्रांची आठवण आली, तिने आपल्या दोन्ही मित्रांना बोलवणं पाठवलं. गुरूजनांची बैठक बसली. तरूण-तरूणीने स्पष्टीकरण दिलं, आणि प्रेमकरण नसल्याचं सांगितलं. या चर्चेत प्राध्यापक मित्राने खूप मदत केली. या मित्राच्या मदतीने मुलांना निर्दोष सिद्ध करण्यास मदत झाली. पण त्या तरूणीला खूप वाईट वाटलं कारण, तिचा आणखी एक मित्र याबाबतीत तेथे असूनही काहीच बोलला नाही, त्याने मौनधारण केल्यासारखी भूमिका घेतली. त्या तरूणाने असं काही दाखवलं की, आपला आणि या तरूणीचा काहीही संबंध नाही.
गुरूसभेच्या निर्णयानंतरही तरूणीच्या चरित्रावर प्रश्न उपस्थित होत राहिले, अफवा अजूनही थांबत नव्हत्या, या दरम्यान तिच्या शिक्षक मित्राने तिला चांगली साथ दिली. पण व्यापारी मित्राने उदासीनता दाखवली, यावर ती तरूणी नाराज होतीच तिला अशा वागण्याने खूप वेदना झाल्या, की या मित्राने आपल्याला साथ का नाही दिली. काही वेळानंतर ही तरूणी अस्वस्थ झाली. तिने आपल्या प्रियजनांसोबत आपल्या दोन्ही मित्रांना पत्र लिहिलं, मला एकांत आणि निर्जन ठिकाणी थोडा वेळ घालवायचा आहे.
ज्यामुळे मला ताणतणावापासून मुक्त होण्यास मदत होईल. लगेच तिला निमंत्रण येण्यास सुरूवात झाली, तिच्या दोनही मित्रांनी तिला आमंत्रण पाठवलं. शिक्षक मित्राकडून आमंत्रण येईल अशी तिला आशा होतीच, पण व्यापारी मित्राने देखील, तिच्या राहण्याची सोय करण्याचा प्रस्ताव पाठवला.तिने दोन्ही मित्रांना वेगवेगळी पत्र लिहिली. तिने एका खास जागेवर भेटण्यासाठी वेळ दिला. ती जेव्हा तेथे पोहोचली तेव्हा दोन्ही हजर होते. शिक्षक मित्र घोड्यासोबत आला होता, दुसरा मित्र रथ घेऊन आला होता. रथावर बसताना शिक्षक मित्राला ती म्हणाली, काही वेळाने व्यापारी मित्राजवळ राहिल्यानंतर, मी तुझ्याकडे येईन. ती हे सर्व सुविधा आणि एकांतनुसार ठरवणार असं तिने सांगितलं.
व्यापारी मित्र तिला शहरापासून काही अंतर दूर असलेल्या एका स्थानी घेऊन गेला. तेथे पोहोचल्यानंतर त्याने सांगितलं, 'मी तुझ्यासाठी एक जागा भाड्याने घेतली आहे, तेथे तुझ्यासोबत एक पुरूष, आणि एक नवजात बालक असेल, सुखाची पूर्ण व्यवस्था असेल.' हे ऐकताच तरूणीच्या डोळ्यातून अश्रू येऊ लागले, त्या अश्रूंनी तिच्या मनातले गैरसमज धुतले गेले. तिने सांगितलं, माझ्या मित्रा, तू संकटाच्या अशावेळी आला आहेस, जेव्हा तुझी सर्वाधिक गरज होती.
कहाणी संपली. दोन मिनिटं थांबा तुम्हाला सर्व लक्षात येईल. जाताना एवढंच की, आपण 'मित्र' आणि 'शुभचिंतक' यांना एकच मानतो, पण दोघांच्या मनाचा रंग अगदी वेगळा आहे, शुभचिंतक आपल्या 'शुभ' गोष्टींचा चिंतक आहे, तर मित्र 'ऋतू'सारखा 'सदाबहार' आहे.
(लेखक 'झी न्यूज़'चे डिजिटल एडिटर आहेत)
(https://twitter.com/dayashankarmi)
(आपले प्रश्न आणि सूचना इनबॉक्समध्ये लिहा: https://www.facebook.com/dayashankar.mishra.54)