भारतात 90 वर्षांपूर्वी धावली होती पहिली AC ट्रेन, कोच थंड करण्यासाठी लढवली होती 'ही' शक्कल
Indian Railway 1st AC Coach Train : भारतीय रेल्वेचे जाळे गावाखेड्यापर्यंत पसरलेय. सर्वसामान्यांची ही रेल्वे ही एक जिव्हाळाचा विषय आहे. तुम्हाला माहितीय का भारतातील पहिली एसी ट्रेन कोणती होती, आणि त्या ट्रेनचे कोच थंड करण्यासाठी कसा वापर केला जायचा.
1/7
भारतीय रेल्वे जनरल डब्ब्यापासून थंडगार एसी ट्रेन आहेत. सामान्यपासून सुपरफास्ट ट्रेनचे जाळं भारतीय रेल्वेमध्ये पाहिला मिळतात. काही दिवसांमध्ये बुलेट ट्रे आणि हायपरलूप ट्रेन धावणार आहे. प्रवाशांना जनरल कोच, स्लीपर कोच, थर्ड एसी, सेकंड एसी आणि फर्स्ट एसी मध्ये वेगवेगळ्या सुविधा देण्यात येतात. पण तुम्हाला माहित आहे का रेल्वेची पहिली एसी ट्रेन कोणती आहे? पहिली एसी ट्रेन कुठून कुठे धावली? त्यावेळी एसी कोच थंड कसा करायचे ते?
2/7
देशातील पहिली एसी ट्रेन ब्रिटिश काळापासून आजही धावत आहे. 91 वर्षांपासून रुळांवर धावणाऱ्या या ट्रेनचे नाव आजपर्यंत अनेकवेळा बदलण्यात आलंय. 1 सप्टेंबर 1928 रोजी जेव्हा ही ट्रेन पहिल्यांदा धावली तेव्हा तिचं नाव पंजाब मेल होतं. ब्रिटिश अधिकाऱ्यांसाठी सुरू झालेल्या या ट्रेनचं नाव 1934 मध्ये पुन्हा बदलण्यात आलं. नावासोबतच प्रथमच ट्रेनमध्ये एसी कोच जोडण्यात आला होता.
3/7
1934 मध्ये एसीची कोच जोडल्यानंतर या ट्रेनचे नाव बदलून फ्रंटियर मेल करण्यात आलं होतं. त्यावेळी भारत आणि पाकिस्तानमध्ये फाळणी झाली नव्हती, त्यामुळे मुंबई सेंट्रलहून अमृतसरला जाण्यासाठी ही ट्रेन पाकिस्तान आणि अफगाणिस्तानच्या लाहोरमधून प्रवास करायची. या लांबच्या प्रवासात फर्स्ट क्लास आणि सेकंड क्लासच्या प्रवाशांना जेवणाचीही सोय देण्यात आली होती.
4/7
पण तुम्हाला माहितीये का, हे एसीची डब्बे थंड ठेवण्यासाठी बर्फाचा वापर केला जायचा. डब्याच्या फरशीवर बर्फाचे तुकडे पसरवले जायचे. त्यावर पंख्यांने हवा दिली जायची. अशात बर्फवृष्टीमुळे डब्यात थंडी जाणवत होती. जेव्हा बर्फ वितळला तेव्हा पुढील स्टेशनवर बर्फाचे तुकडे पुन्हा भरले जायचे. बर्फाचे बॉक्स कुठे ठेवायचे हे आधीच ठरवले असायचे.
5/7
6/7