दयाशंकर मिश्र : जे प्रेम विवाहात एक वळणदार प्रवास सहज पार करतात, आणि ते जसे एकटे पडतात, अशा वेळीच संकटं वाढत असतात. अशा नात्यांचं खरं आव्हान सर्वकाही सामान्य झाल्यानंतर सुरू होतं. जेथे प्रेम होतं, तेथे नाराजी होतेच, नाराजी देखील तेव्हा होते, जेव्हा प्रेमाचा रंग अधिक गडद होत जातो. या प्रकारे प्रेम आणि नाराजी एकच नावेतील दोन सहप्रवासी आहेत. सहप्रवासी असल्याने एकमेकांबद्दल तक्रारी स्वाभाविक असतीलच. जेथे स्वाभाविक आहे, तेथे ठिक आहे, पण अडचण तेथे होते, जेथे आपण आपल्या जगात रमतो. तेथे नात्यात 'आपण' ऐवजी 'मी'पणा येतो.


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

एक दशकात समाजात प्रेम विवाहाची  हवा ताज्या वाऱ्यासारखी आली आहे. यात जात, समाज आणि असमानतेची बंधनं कमजोर झाली आहेत. यासाठी हवेसोबत चालणाऱ्यांची काळजी घेणे, ही आपल्यातील विशेष जबाबदारीचा भाग झाला पाहिजे. प्रत्येक दिवशी न्यूजपेपरमध्ये, समाजातून येणाऱ्या बातम्यांमध्ये दिसतं, प्रेम विवाह करणाऱ्या तरूण दांम्पत्याच्या संबंधांमध्ये 'गोडवा' कायम ठेवण्यासाठी संघर्ष करावा लागतोय.


या संघर्षात समाजाचा प्रत्येक घटक सामिल आहे. यात ऋतिक-सुजैन, आमिर खान-रीना दत्ता आणि अर्जुन रामपाल-मेहर जेसिया हे चेहरे चर्चेत राहिलेले आहेत ते चर्चेत राहतात, पण संबंध तुटण्याची त्यांची बातमी, समाजाच्या मनावर खोलपर्यंत प्रभाव करते. याला 'सेलिब्रिटी कल्चर' म्हणून फेटाळून लावता येणार नाही. हे आपल्यामध्ये होतंय, हे स्वीकारून, त्याचं समाधान काढणे शक्य आहे.


डिअर जिंदगीला लिहिलेल्या ई-मेलमध्ये काही असे युवक आपले अनुभव शेअर करतात, ज्यांनी समाजाशी वैर घेत, प्रेमविवाह केला आहे. प्रेम ते विवाह सारखा वळणदार प्रवास तर त्यांनी सहज पार केलं आहे, पण दोन्ही वेगळे झाले, तर संकट वाढत जातं. हा अनुभव हा इशारा देतो की, नात्याला सांभाळण, तिथ पर्यंत कठीण नसतं, जोपर्यंत आपण बाहेरच्या आव्हानांचा सामना करत नाहीत. खरं तर अडचण तेव्हा होते, जेव्हा आपण संकटाचा सामना करतो, आणि प्रत्येक दिवसाचा (डेली लाईफ) आपण भाग होतो. 


विश्वास ठेवा, प्रत्येक दिवसाचं जीवन, सर्वात कठीण जीवन आहे, ज्यात बाहेरून एखादं आव्हान दिसत नाही. कोणतंही संकट दिसत नाही, पण शेवटी संकट येथेच येऊन उभं राहण्यास सुरूवात होते, कारण हे दोन्ही जणांवर येणारं संयुक्त संकट नाहीय. कारण अशा संकटासाठी आपण नात्यात येण्याआधीच तयार होतो.


कारण, आपण या गोष्टीसाठी तयार नव्हतो की, जर एखाद्या दिवशी कुणाला राग आला, तर राग काढणार कोण? जर कुणी आपल्या ऑफिसच्या कामात खूप बिझी होईल आणि दुसरा आपल्या करिअरच्या रेसमध्ये मागे राहणार असेल, तेव्हा सांभाळणार कोण!. कधी कधी गंमतीत का असेना, एखाद्याचं नाव तिसऱ्याशी जोडलं गेलं, तेव्हा ती 'कागदी' नाराजी, दूर करणार तरी कोण?, त्या साथीदाराच्या स्वप्नाचं काय होईल, जो दुसऱ्याच्या करिअरसाठी आपल्या स्वप्नाला डोळ्यातच राहू देईल.


यासाठी, ज्यांनी जगाशी लढून आपलं नातं जिंकलं आहे. तर निश्चितच समजून घ्यावं लागेल, नातं कुठं तुटतंय. नातं तुटण्यात, आता पैशांची भूमिका फार कमी राहिलेली आहे. बहुतांश स्त्री-पुरूष हेच म्हणतायत, की त्यांचा साथीदार त्यांच्या नात्याला समजू शकलेला नाही. किती आश्चर्याची गोष्ट आहे. पाच ते दहा वर्षापासून एकमेकांना ओळखणारे, पुढील काही वर्षात एक दुसऱ्याला समजून कसं घ्यायचं हे विसरून जातात. सोबत मिळाल्यावर आनंदी राहणं विसरून जातात. का?.


कारण ते एकमेकांचं स्वातंत्र्य हिरावून घेतात. लग्नाआधी स्वातंत्र्य, पारदर्शकता, आणि एक-दुसऱ्याला सहन करण्याची क्षमता, लग्न होताच संपून जाते. सर्व संकटांचं सूत्र हेच आहे. आपल्या बाहेरील आणि आतील जीवनात जो सामान्य आहे. रोजचं आहे, प्रत्येक दिवसाचं आहे. प्रत्येक दिवशी एकमेकांशी कसा स्नेह आणि आत्मियता कायम ठेवावी. हा सर्वात मोठा प्रश्न आहे. याचं जेवढं चांगलं उत्तर त्यांच्याकडे आहे, ज्यांच्याकडे हा प्रश्न आहे, त्याचं तेवढं सर्वोत्तम उत्तर त्यांच्याशिवाय कुणाकडेच नाही, गरज आहे फक्त अंतरमुख होण्याची, आत्मपरिक्षणाची.


(लेखक 'झी न्यूज़'चे डिजिटल एडिटर आहेत)


(https://twitter.com/dayashankarmi)


(आपले प्रश्न आणि सूचना इनबॉक्‍समध्ये लिहा: https://www.facebook.com/dayashankar.mishra.54)