दयाशंकर मिश्र : मुलं देवाघरची फुलं, असं म्हणतात, हा लेख मुलांशी कसा संवाद साधला पाहिजे, याच्यावर प्रकाश टाकणारा आहे. ‘डिअर जिंदगी’ या सदरात असे विषय समोर येत आहेत, जे आपल्या घरात, अंगणात, चारभिंतीत तणाव निर्माण करतात. महानगरांसह लहान लहान गावांमध्ये देखील, सामाजिक स्वरूपात अत्यंत मनमिळावू वातावरण असणारी शहरं देखील आता, तणावाच्या प्रदूषणाखाली आली आहेत.


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

जीवनाच्या आधारशिलेचं खाली डोकं वर पाय करण्यात आलं. जीवनात अनेक कामं आहेत. अतिशय जीवघेणी स्पर्धा आहे. एक संधी चुकली, म्हणजे तुम्हाला असं वाटतं अख्खं जीवन दुसऱ्या नंबरवर आहे. पहिल्या नंबरवर करिअर, दुसऱ्या नंबरवर बॅलेन्स, दुसऱ्यांपेक्षा 'जास्त' आला.


या सर्वांकडून तणाव मन, मेंदूचा आधार घेऊन यात्रा करत, आपल्या आत्म्याचं अमृत चोरून नेतोय. प्रत्येक दिवशी तो रूप बदलून येतो. जीवनाची चव पळवून घेऊन जातोय.


शनिवारी जयपूरमध्ये एका युनिवर्सिटीत मुलांशी डिअर जिंदगीच्या माध्यमातून तणाव, डिप्रेशनवर संवाद करत होतो. तेथे सर्वांसमोर शिक्षक आणि मुलांनी मनातली गोष्ट उघडपणे नाही सांगितली. पण संवाद झाल्यानंतर काही जणांनी खासगीत, त्यात शिक्षक आणि विद्यार्थीही होते, त्यांनी आपल्या परिवारातील काही बाबींवर चर्चा केली.


यात एका ज्येष्ठ शिक्षकाने आपल्या मुलाबद्दल विस्तृतपणे चर्चा केली. त्यांची मुलगी दहावीत आहे. दोन महिन्यापासून सर्वप्रकारे समजावूनही ती शाळेत जायला तयार नाही. ती कुणाशीही बोलायला तयार नाही. तिने आपल्या आजूबाजूला मूकपणाची भिंत बांधून घेतली आहे. ती भिंत कुणालाही पाडता येत नाहीय.


त्यांच्याशी झालेली बातचीत थोडक्यात....


१) सर्वात आधी मुलीला विश्वासात घेण्याचा प्रयत्न करा. तिला धमकावणे, तिच्याकडून सर्वकाही जाणून घेण्याच्या जागी, तिला स्नेहपूर्ण वातावरणात समजून घेण्याचा प्रयत्न करा.


२) मुलांकडून ज्या अपेक्षा आहेत, त्या विसरून जा. आपण मुलांना मोठं होऊ दिलं पाहिजे, पण त्यांच्यावर अपेक्षांचं ओझं देऊ नका. कारण मुलांनी किती मार्क्स पाडले, त्याच्याशी आपण आपली प्रतिष्ठा जोडून ठेवली आहे.


३) आपण नीट समजून घेतलं पाहिजे की, मूलं आपल्यापासून आहेत, आपल्यासाठी नाहीत. मुलं एखादं प्रॉडक्ट नाहीत. मुलांना प्रॉडक्ट समजून त्यांना मार्केटमध्ये खपवण्यासाठी आपण कंपन्यांसारखी त्यांच्याविषयी पॉलिसी बनवणे चुकीचे आहे.


४) मुलांशी घरी जर विस्तृतपणे बोलणे शक्य होत नसेल, तर त्यांना घरापासून लांब, एखाद्या छोट्याशा सहलीवर घेऊन जा.


५) मुलांना समजवा की त्यांचं जीवन सर्वात अमूल्य आहे, त्यापेक्षा मोठं काहीही नाही. ना समाज, ना कोणती परीक्षा, ना कोणता रिझल्ट. तुमच्यात आणि मुलात यापैकी काहीही आडवं यायला नको. 


६) सर्वात शेवटची आणि महत्वाची बाब. जर मुलाचं वागणं बोलणं तुम्हाला थोडसंही वेगळं वाटत असेल, जर प्रकरण तुमच्या हाताबाहेर गेल्यासारखं वाटत असेल, तर एखाद्या अनुभवी मानसोपचार तज्ञाला वेळ न घालवता दाखवा.


मानसोपचार तज्ञाकडे न जाणं ही भारतातील सर्वात मोठी अडचण आहे. याविषयी आपला दृष्टीकोन अजूनही स्पष्ट होण्यापासून हजारो किलोमीटर दूर आहे. आपल्याला असं वाटतं की, मानसोपचाराकडे जाणं, म्हणजे तुमच्या मुलाच्या मानसिक अवस्थेवर प्रश्नचिन्हं उभं करण्यासारखं आहे. पण याला अधिक साधे सरळपणाने समजून घेण्याची गरज आहे.


जसं ताप, सर्दी आपण घरगुती उपायाने ठिक होत नाही, तेव्हा डॉक्टरकडे जातो, तसंच मन, हृदय आणि मेंदूलाही समजावण्याची गरज असते. त्यांना देखील स्नेह आणि प्रेमाची तेवढीच गरज आहे.


या मोकळेपणाने, मन, हृदय, मेंदूवर संवाद करावा. त्याला योग्य ठिकाणी ट्रिटमेंट द्या. तेव्हाच आपण तणाव, उदासपणा, नैराश्यापासून स्वत:ला वाचवू शकतो.


ईमेल : dayashankar.mishra@zeemedia.esselgroup.com


पता : डिअर जिंदगी (दयाशंकर मिश्र)
Zee Media, वास्मे हाऊस, प्लॉट नं. 4, 
सेक्टर 16 A, फिल्म सिटी, नोएडा (यूपी)


(लेखक 'झी न्यूज़'चे डिजिटल एडिटर आहेत)  (https://twitter.com/dayashankarmi)
(आपले प्रश्न आणि सूचना इनबॉक्‍समध्ये लिहा: https://www.facebook.com/dayashankar.mishra.54)