'या' देशांमध्ये पाऊल ठेवताच भारतीय होतात श्रीमंत; जगतात आलिशान आयुष्य, पैसा संपता संपत नाही

Country where Indian Currency stronger:  आज आपण अशा देशांबद्दल जाणून घेणार आहोत जिथे भारतीय चलनाला फार मूल्य आहे. तुम्ही या देशांमध्ये फक्त 100 रुपये घेऊन गेलात तरी पोतं भरुन सामान घरी आणू शकता.  

| Nov 28, 2024, 20:24 PM IST

Country where Indian Currency stronger:  आज आपण अशा देशांबद्दल जाणून घेणार आहोत जिथे भारतीय चलनाला फार मूल्य आहे. तुम्ही या देशांमध्ये फक्त 100 रुपये घेऊन गेलात तरी पोतं भरुन सामान घरी आणू शकता.

 

1/6

2/6

व्हिएतनाम एक असा देश आहे जिथे भारताचा एक रुपया 300.41 डोंग म्हणजे व्हिएतनाम चलन होतं. याचा अर्थ तुम्ही अत्यंत कमी बजेटमध्ये संपूर्ण दौरा पूर्ण करु शकता.  

3/6

रुपयाची ताकद बघायची असेल तर इराणमध्ये बघा. या देशात तुमची एक रुपयाची नोट 497.94 इराणी रियाल होते. म्हणजेच, तुमच्या खिशात 100 रुपयांची नोट देखील असेल तर ती 49,791.51 इराणी रियालमध्ये बदलेल. याचा अर्थ भरपूर खरेदी करण्याची संधी आहे. पण इराण आणि इस्रायलमधील रक्तरंजित संघर्षामुळे येथे पर्यटकांचा प्रवास बंद आहे.   

4/6

लाओस हा दक्षिणपूर्व आशियातील एक देश आहे, जो नैसर्गिक संसाधने, नैसर्गिक सौंदर्य, घनदाट जंगले आणि मोकळे निळे आकाश यासाठी प्रसिद्ध आहे. या देशात भारतीय रुपया खूप शक्तिशाली आहे. या देशात, 1 भारतीय रुपया 260.51 लाओ किपमध्ये रूपांतरित केला जातो.  

5/6

इंडोनेशिया - निसर्गाचे सौंदर्य, द्वीपसमूह, 17,000 पेक्षा जास्त बेटांसह, जगातील सर्वात नेत्रदीपकांपैकी एक आहे. जर तुम्ही इथे भेट देण्याचा विचार करत असाल तर तुम्हाला जास्त बजेटची गरज नाही. येथे 1 भारतीय रुपया 187.32 इंडोनेशियन रुपिया मध्ये रूपांतरित होतो.  

6/6

श्रीलंकेत एका रुपयाच्या बदल्यात 3.47 श्रीलंकन ​​रुपये बदलले जातात. त्याचप्रमाणे, दक्षिण कोरियामध्ये, एक भारतीय रुपया 16.69 दक्षिण कोरियन वॉनमध्ये बदलला जातो. हंगेरीमध्ये एका रुपयाला 4.69 हंगेरियन फॉरिंट्स मिळतात, तर कंबोडियामध्ये 48.03 कंबोडियन रिल्स एका रुपयात मिळतात.