दयाशंकर मिश्र : हा प्रेमविवाह नव्हता. तरी देखील याच्यातील अनेक तत्व प्रेम विवाह सारखे आहेत. अचानक भेटणे, भेटून एक नवीन स्वप्न गुंफणे. त्याच्याशी कोमलता आणि दुसऱ्यांशी डोळ्यात डोळे घालून लढण्याची क्षमता. कुणालाही आव्हान देण्याची तयारी.


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

हे सर्वकाही प्रेमविवाहात होतं. ही तर दोन्ही पक्षांची सहमती, स्नेह आणि विश्वासाच्या आधारावर झालं होतं. तरी देखील त्याच्या भिंती हादरत होत्या.


दक्षता आणि सुकुमार त्रिपाठी सोबत देखील असंच झालं. एक अरेंज मॅरेजमध्ये असं काही वळणं आलं, की ते धोकादायक ठरलं. ज्यामुळे त्यांच्या  शांत जीवनात वादळ निर्माण झालं. आपल्या येथे नातं, हे नातं सांभाळण्यात फार किंचीत वेळा भूमिका घेतात. पण नातं तुटण्यात आणि दूर जाण्यात, नात्याची भूमिका नसेल, ही शक्यता नाकारता येत नाही.


येथे देखील तेच होत आहे. जखम ठीक करण्याच्या जागी, तिला पुन्हा उकरून काढलं जातंय. तिला भळभळत ठेवण्याचं, चुकून का असेना, मीठ लावण्याचं काम दोन्ही पक्षांकडून होत राहतं. कारण कुणीही सांभाळून, प्रेम, स्नेह आणि आत्मीयतनेने एक साथ संवाद करण्याचा प्रयत्न केला नाही.


'डिअर जिंदगी'तील काही लेखांच्या प्रभावानंतर मित्र उमेश मिश्र यांनी हे विषय चर्चेत आले पाहिजेत असं सांगितलं. मी त्यांना जे काही सांगितलं तेच या लेखात आहे. याप्रमाणे हा अंक दक्षता आणि सुकूमार यांच्या संवादाची कहानी आहे.


मी त्यांच्याशी हे सर्व बोलत असताना आमची चर्चा यावर संपली की, पांच वर्षात नात्याला कटूतेची आलेली जखम एका दिवसात भरून निघणार नाही. घुडघ्याचं दुखणं एका दिवसात ठीक करता येत नाही. हो पण योग्य डॉक्टर मिळाले, तरी पहिल्या दिवसापासून उपचार योग्य दिशेने जाऊ शकतात.


खरं तर आपण संवाद, काऊन्सिलिंगपासून एवढे दूर आहोत की बस, एक दुसऱ्यांना आपण कमी लेखण्यात, एक दुसऱ्यांच्या चुका मोजण्यात, आयुष्य घालवतो. आपणच ओढवून घेतलेलं दु:ख मोहम्मद रफीच्या दिलकश आवाजात ऐकण्याचा सिंड्रोम कायम जिवंत ठेवतो. यात आता मात्र गायकांचं नाव बदलंय, आणि काही नाही.


एक सामाजिक स्वरूपात आपण भौतिक रूपात निरंतर प्रगती करत आहोत. आपलं जीवन विज्ञानाच्या आविष्काराने, तंत्रज्ञानाने समृद्ध झालं आहे. आपण चंद्रावरून पुढे जाण्याचं, स्वप्न पाहत आहोत, पण या दरम्यान आपल्याकडे एक आजारी समाजही निर्माण होतोय. येथे मुलांना थोडंस लागलं, खरचटलं, ताप आला की डॉक्टरांना दाखवण्याची परंपराच आहे, पण मनाच्या आरोग्याशी काही कुणाला घेणं देणं दिसत नाही.


मनाला प्रेरणा, उत्साहाचा सहारा पाहिजे, ही गोष्ट आम्ही स्वीकारण्यास तयार नाहीत. आपल्या आजूबाजूला संताप, तणाव, नैराश्य वाढत चाललं आहे. वाढता अंहकार आणि समजुतदारपणा नसल्याने नाती तुटत आहेत. पण अजूनही काऊन्सिलिंग आणि संवाद दूर आहे.


आपण दुसऱ्यांबद्दल खूप गप्पा मारतो. बॉलीवूडमधील लोकांच्या ब्रेकअपवर तासभर गप्पा मारतो. मी़डियात छापून येणाऱ्या घटनांवर देखील बोलतो, पण घरात जेव्हा तणाव असतो, नैराश्याचा भाव चेहऱ्यांवर दिसतो, तेव्हा आपण त्यावर न बोलता विषय बदलतो.


विषय बदलणे, हे सर्वात जास्त धोकादायक आहे. कारण आपण आपल्याच घरी, किंवा शेजारी सर्वात गंभीर गोष्टीकडे दुर्लक्ष करीत आहोत. धरणावरून पाणी सोडण्याचा इशारा पुन्हा पुन्हा दिल्यानंतरही, आपण हे मानत नाहीत, की आता आपणही नदी किनारी उभं राहणं धोकादायक आहे. यात धरण आणि नदीचं काही नुकसान होणार नाहीय, जे होईल ते आपलं नुकसान होईल.


यासाठी जीवन बचावासाठी येणारे संदेश, इशारा, तो देखील गंभीरतेने, नीट ऐका. जीवनभर आपल्याला याचा पश्चाताप नको की, मी त्यांचं ऐकलं असतं तर, याचा पश्चाताप जीवनभर करण्याची वेळ यायला नको.


(लेखक 'झी न्यूज़'चे डिजिटल एडिटर आहेत)  (https://twitter.com/dayashankarmi)
(आपले प्रश्न आणि सूचना इनबॉक्‍समध्ये लिहा: https://www.facebook.com/dayashankar.mishra.54)