PHOTO: तेलुगू समाजाबद्दल वादग्रस्त विधान, गुन्हा दाखल होताच 'ही' अभिनेत्री बेपत्ता

Actress Kasturi Shankar Controversy: साउथमधील एक अभिनेत्री वादग्रस्त विधानामुळे चर्चेत आली आहे. पोलीस स्टेशनमध्ये FIR दाखल होताच अभिनेत्री गायब झाली आहे. कोण आहे ती अभिनेत्री? वाचा सविस्तर 

| Nov 13, 2024, 12:29 PM IST
1/7

कस्तूरी शंकर

साउथ अभिनेत्री कस्तूरी शंकरला एका अशा समस्येचा सामना करावा लागत आहे. ज्यामधून वाचण्यासाठी अभिनेत्रीला गायब व्हावे लागले आहे. 

2/7

आधि भगवान

कस्तूरी शंकर ही साउथमधील प्रसिद्ध अभिनेत्री आहे. जिने 1991 मध्ये 'आधि भगवान' चित्रपटातून करिअरला सुरुवात केली होती. तिने अनेक चित्रपट केले आहेत. 

3/7

गुन्हा दाखल

काही दिवसांपूर्वी अभिनेत्रीने तामिळनाडूमधील एका कार्यक्रमात तेलुगू समाजाबद्दल वादग्रस्त विधान केले होते. त्यानंतर लोकांचा राग अनावर झाला. तिच्यावर गुन्हा दाखल  झाला आहे. 

4/7

अभिनेत्री गायब

गुन्हा दाखल होताच अभिनेत्री गायब झाल्याची माहिती मिळत आहे. पोलीस देखील तिचा शोध घेत आहेत. चाहत्यांनी देखील अभिनेत्रीच्या विधानावर नाराजी व्यक्त केली आहे.   

5/7

वादग्रस्त विधान

कस्तूरी शंकरने सार्वजनिक कार्यक्रमा 'तेलुगू लोक हे प्राचीन काळात राजांची सेवा करणाऱ्या महिलांचे वंशज आहेत असं विधान केलं होतं. 

6/7

तक्रार दाखल

तिच्या वक्तव्यामुळे तेलुगू समाजात संताप पसरला आहे. कस्तुरीवर अनेक तक्रारी दाखल झाल्या आहेत. ज्यामध्ये समाजाच्या भावना दुखावल्याचा आरोप आहे. अभिनेत्रीला कायदेशीर नोटीस पाठवली आहे. 

7/7

विधानाचा संदर्भ

कस्तुरीने तिच्या विधानाचा संदर्भ सांगितला आहे. ती त्या उप-मजूर लोकांबद्दल बोलत होती. जे तिच्या मते, तेलुगू राजांसह अनेक दशकांपूर्वी तामिळनाडूमध्ये आले होते.